आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Killed After Two storey Warehouse Collapses In Mumbai

मुंबईत पुन्हा इमारत कोसळून दोन जण ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वाकोला येथील न्यू शंकरलोक इमारत कोसळून सात जण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी पहाटे साकीनाका येथील आणखी एक इमारत कोसळून दोघांचे बळी गेले. इस्माईल आणि अमीन अशी मृतांची नावे असून ते कामगार होते.

साकीनाका येथील आझमी कंपाउंड येथील इमारतीत अनधिकृत पोटमाळा निर्माण केला होता. तसेच या निवासी इमारतीचा वापर गोदामासाठी करण्यात येत होता. रविवारी पहाटे चार वाजता अचानक पोटमाळा कोसळला. त्याखाली झोपलेले तीन मजूर ढिगार्‍याखाली अडकले होते.

अग्निशमन दलाच्या जवानांनी मुबारक मुन्ना या मजुरास सुखरूप बाहेर काढले. शुक्रवारी वाकोल्या सात मजली इमारत कोसळून सात जणांचा बळी गेला होता. त्याच्या दोनच आधीच साकीनाका येथेही दोघांचा बळी गेला. लागोपाठच्या दोन दुर्घटनांनी मुंबईतील जुन्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालिकेचा कारभाराचे पितळ उघडे पडले आहे.

ठाण्यात इमारतीला आग; वृद्ध दांपत्याचा होरपळून मृत्यू
ठाणे । ठाण्यातील समतानगर भागातील गुलमोहर सोसायटीच्या नवव्या मजल्यावर लागलेल्या आगीत होरपळून एका वृद्ध दांपत्याचा मृत्यू, तर दोन जण जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी घडली. शिवाजीराव चौगुले (८4), निर्मला चौगुले (७८) असे मृत दांपत्याचे नाव आहे, तर सावे दापंत्य यात जखमी झाले.