आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान मुंबई..प्रवाशांचा खिसा कापते ही \'ब्लेड गॅंग\'; पकडले गेल्यास कापून घेतात स्वत:चा गळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईसह उपनगरात अनेक रेल्वे स्टेशन्सवर 'ब्लेड गँग'ची दहशत आहे. गँग मेंबर्स रात्री उशीरा रेल्वे स्टेशनवर येतात. प्लॅटफार्मवर झोपलेल्या प्रवाशांना टार्गेट करून ब्लेडने त्यांचा खिसा कापतात.

कुर्ला रेल्वे स्टेशनवर अशीच एक घटना बुधवारी (9 ऑगस्ट) रात्री सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली. एका चोरट्याने प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या दोघांचा खिसा कापण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा गेम फसला आणि तो पकडला गेला. त्याने काही कळण्याच्या आतच ब्लेडने स्वत:चा गळा कापून घेतला. प्रवाशी घाबरले आणि त्यांनी त्याला सोडून दिले.

अशा आवळल्या मास्टरमांइडच्या मुसक्या...
- जीआरपीनुसार, वांद्रे, कुर्ला, दादर आणि मुंब्रा रेल्वे स्टेशन्सवर मागील काही दिवसांपासून प्रवाशांच्या खिसे कापण्याच्या घटना घडल्या होत्या. मुंबईत 'ब्लेड गॅंग' सक्रीय झाल्याचे चौकशीत समोर आले.
- गँग रात्री उशीरा रेल्वे स्टेशनवर दाखल होते. प्लॅटफार्मवर झोपलेल्या प्रवाशांना टार्गेट करून त्यांचा खिसा कापते.
- गँगला पकडण्यासाठी जीआरपीने एक पथक तैनात केले.
- जीआरपी पथकाने कुर्ला रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कचरा उचलणार्‍या एका संशयित व्यक्त‍िला सापळा रचून अटक केली.  
- त्याने प्लॅटफार्मवर झोपलेल्या दोघांचा त्यांचा खिसा कापण्याच्या प्रयत्नात होता. तितक्यात जीआरपीच्या पथकाने त्याला अटक केली.
- इस्माइल असे त्याचे नाव आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार जीआरपी पथक कुर्ला रेल्वे स्टेशनवरून फारूक नामक चोरट्याला अटक करण्यासाठी गेले असता त्याने ब्लेडने गळा कापून स्वत:ला रक्तबंबाळ करून घेतले.

चोरटे स्वत:कडे ठेवतात किमान 10 ब्लेड...
- जीअारपीच्या जवान चौरट्यांची कसून चौकशी करत आहेत. एक चोरटा स्वत:कडे किमान 10 ब्लेड ठेवत असल्याची धक्कादायक माहिती चौकशीत समोर आली. तोंड, हात, कपडे आणि चप्पलमध्ये ते ब्लेड लपवतात.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले फोटो...
बातम्या आणखी आहेत...