आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two More Candiate Decleared Shivsena, Hemant Ghodse From Nashik

सेनेचे आणखी दोन शिलेदार जाहीर, नाशकातून हेमंत गोडसे तर उस्मानाबादमधून रवी गायकवाड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आगामी लोकसभेसाठी शिवसेनेने आणखी दोन आपले शिलेदार जाहीर केले आहेत. नाशिकमधून हेमंत गोडसे यांना तर, उस्मानाबादमधून रवी गायकवाड यांना सेनेने उमेदवारी जाहीर केली आहे.
नाशिकमध्ये स्ट्रॅस्टेजीचा भाग म्हणून उमेदवारी जाहीर केली नव्हती. तर, उस्मानाबादमध्ये रवी गायकवाड आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होती. सेनेत येथे दोन गटात प्रचंड रस्सीखेच सुरु होती त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ही जागा भाजपला सोडता येईल का म्हणून चाचपणी केली होती. त्याबदल्यात भिवंडीचा प्रस्ताव भाजपने दिला होता. भाजपला उस्मानाबादमधून रूपाताई निलंगेकर-पाटील यांच्यासाठी हवी होती. मात्र, ठाणे जिल्ह्यातील भाजपने ही जागा सोडण्यास नकार दिला. कारण ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि ठाणे या दोन्ही जागा सेनेकडे असल्याने भिवंडी जागा सोडल्यास संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून भाजप हद्दपार होईल. त्यातच ठाणे, कल्याण शहरात संघाची मते आहेत. सेनेकडे या दोन जागा दिल्याने आधीच नाराज असलेला संघाने भिवंडीची जागा सोडण्यास नकार दिला.
मुंडे ही जागा सोडण्यास तयार होते मात्र संघ वर्तुळातून दबाव आल्यानंतर भिवंडीची जागा भाजपने आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उस्मानाबादमधून सेनेनेच लढावे, असा निरोप गोपीनाथ मुंडे यांनी काल मातोश्रीवर जाऊन दिला. त्यामुळे अखेर आज उस्मानाबादमधून रवी गायकवाड यांचे नाव जाहीर करण्यात आले.