आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पा शेट्टीचे फोटो काढणार्‍या 2 फोटोग्राफर्सला हॉटेलच्या बाऊंसर्सकडून बेदम मारहाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राचे फोटो काढणार्‍या दोन फोटोग्राफर्सना हॉटेलच्या बाऊंसर्सने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाणीत एक फोटोग्राफर गंभीर जखमी झाला आहे. फोटोग्राफर्सच्या तक्रारीनंतर मुंबईतील खार पोलिसांत दोन बाऊंसर्सला अटक केली आहे.

हॉटेलबाहेर शिल्पा शेट्टीने दिल्या वेगवेगळ्या पोझ...
- मिळालेली माहिती अशी की, ही घटना काल (गुरुवारी) रात्री 1 ते 2 वाजेदरम्यान घडली. शिल्पा शेट्टी पतीसोबत खार भागातील हॉटेल बस्तियनमधून बाहेर येत होती.
- दोघांना पाहाताच काही फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटो काढण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे शिल्पा शेट्टी ही हॉटेलबाहेर फोटोग्राफर्ससमोर वेगवेगळ्या पोझ देत होती.
- यादरम्यान हॉटेलचे दोन बाऊंसर तिथे आले आणि त्यांना फोटोग्राफर्सला हटकले. परंतु फोटोग्राफर्सने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.
- शिल्पा शेट्टी कारमध्ये बसल्यानंतर बाऊंसर्सनी फोटोग्राफर्सवर हल्ला केला. दोघांना बेदम मारहाण केली.

बाऊंसर्स अटकेत...
- राजू आणि हिमांशु शिंदे अशी फोटोग्राफर्सची नावे आहेत. दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मारहाणीत एका फोटोग्राफरचे कपडे फाटले. त्याच्या चेहर्‍यावर अनेक जखमा झाल्या आहेत.
- दोघांनी 100 नंबर डायल करून पोलिसांना मारहाणीबाबत माहिती दिली.
- घटनेच्या एक तासानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. फोटोग्राफर्सच्या तक्रारीनंतर आज (शुक्रवारी) पहाटे दोन्ही बाऊंरर्सला पोलिसांनी अटक केली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... घटनेशी संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...