आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शक्तीमिलमध्ये यापूर्वीही दोघींवर अत्याचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महिला छायाचित्रकारावर सामूहिक बलात्कार करणार्‍यांनी आरोपींनी निर्जन शक्तीमिलमध्ये यापूर्वीही दोन महिलांवर बलात्कार व एकीचा विनयभंग केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस अधिकार्‍यांनी दिली. दरम्यान, सामूहिक बलात्कार प्रकरणात आणखी एक प्रत्यक्षदश्री साक्षीदार आम्हाला सापडला असून सुरक्षेच्या कारणास्तव त्याचे नाव जाहीर करण्यात येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

पाचही आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून त्यांनी कसून चौकशी केली जात आहे. शक्तीमिलचे ओसाड मैदान या पाचही जणांचा अड्डा होता. यापूर्वी एक कचरा वेचणारी महिला व एका वेश्येवर याच ओसाड जागी बलात्कार केला तसेच आपल्या पालकांसोबत या भागात आलेल्या एका विवाहितेचा विनयभंग केल्याची कबुलीही आरोपींनी पोलिसांना दिली आहे. सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या या प्रकरणी पोलिसांत मात्र कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.
न्यायवैद्यक तज्ज्ञांकडून घटनास्थळाची पाहणी
दिल्ली आणि गुजरात येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकांनी मंगळवारी अत्याचाराची घटना घडलेल्या शक्ती मिल परिसराची पाहणी करून पाच आरोपींच्या विरोधात पुरावे गोळा केले. ही दोन्ही पथके तपासात मुंबई पोलिसांना मदत करत आहेत. या पथकाला मिल परिसरात फुटलेली बिअरची बाटली मिळाली आहे. त्या बाटलीच्या मदतीनेच पीडितेला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.