आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: नवी मुंबईसाठी ठरली काळरात्र, दोन अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी मुंबई- नवी मुंबईसाठी कालची रात्र ही काळरात्र ठरली. एपीएमसीजवळ झालेल्या कार आणि बाईक अपघातात दोन जण ठार झाले तर पामबीच रोडवर कार झाडाला धडकल्याने दोघांचा जीव गेला.
काल रात्रीच्या सुमारास पनवेल रोडवरुन एक अल्टो कार वाशीच्या दिशेने जात होती. ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने ही कार झाडावर आदळली. धडकेची तीव्रता एवढी होती, की कारमधील दोन प्रवासी आत अडकून पडले. त्यांना बाहेर काढण्यासाठी तब्बल तासभर प्रयत्न करावे लागले. या कारचा चक्काचूर झाला आहे.
दुसरीकडे पामबीच रोडवर भरधाव जाणाऱ्या इनोव्हाने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर असलेले दोघे गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलिस दोन्ही प्रकरणाचा तपास करीत आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, चक्काचूर झालेली कार...