आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Sisters Beaten To Four Lady Police At Police Station At Virar

विरारमध्ये दोन बहिणींची पोलिस ठाण्यात घुसून चार महिला पोलिसांना मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रतिकात्मक छायाचित्र)
मुंबई- ठाण्यातील महिला वाहतूक पोलिसाला एका शिवसैनिकाने भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना घडली नाही तोच विरारमध्ये चार महिला पोलिसांना पोलिस ठाण्यात घुसून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विरारमधील अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात प्रज्ञा सिंह आणि गार्गी सिंह या दोन बहिणींनी महिला पोलिसांना मारहाण केली. दरम्यान, पोलिसांनी प्रज्ञा सिंह व गार्गी सिंह या दोघींनाही ताब्यात घेतले आहे.
याबाबतची माहिती अशी की, चार दिवसापूर्वी प्रज्ञा व गार्गी या दोन बहिणींनी अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात एका तरूणाविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला की नाही याची माहिती घेण्यासाठी सोमवारी सायंकाळी त्या पोलिस ठाण्यात आल्या होत्या. मात्र, पोलिसांनी ही तक्रार मराठीत लिहून घेतली होती. आम्हाला मराठी कळत नाही तुम्ही हिंदीतून अथवा इंग्रजीतून तक्रार लिहा तरच आम्हाला यात काय लिहले आहे ते कळेल अशी विनंती केली. मात्र, महिला पोलिसांनी आम्ही काम कसे करायचे ते तुम्ही शिकवू नका असे सांगितले. त्यातून वाद सुरु झाला. त्यानंतर दोघी बहिणींनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तसेच महिला पोलिस कर्मचा-यांना शिवीगाळ द्यायला सुरूवात केली.
वाद वाढत चालल्याने तेथे उपस्थित असलेल्या महिला पोलिस कर्मचारी रूपाली भोईर या दोघी बहिणींना समजावू लागल्या. मात्र, दोन्ही बहिणींनी भोईर यांना धक्काबुक्की केली. धक्काबुक्की सुरु असल्याचे पाहून इतर महिला पोलिस कर्मचारी तेथे धावल्या. मात्र, या दोघी बहिणींनी महिला पोलिस कर्मचारी जयंती राजगुरु व अवती मनीषा यांना चावण्याचा प्रयत्न केला. यात मनिषा यांच्या हातावर व गालावर चावा घेतला, तर राजगुरु यांच्या पायाला दोघी बहिणींनी चावा घेतला. या घटनेनंतर पोलिसांनी दोघींना ताब्यात घेतले. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा व सरकारी कर्मचा-यांना मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.