आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाइन फ्लूचे मुंबईत दोन रुग्ण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईत स्वाइन फ्लूने पुन्हा एकदा डोके वर काढले असून रविवारी दोघांना फ्लूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्लीतही स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले होते. तसेच पुणे येथेही एका नागरिकाला फ्लूची बाधा झाल्याचे आढळून आले होते. रविवारी मुंबईतील मुलुंड येथे दोघांना फ्लूची बाधा झाल्याचे आढळून आले.

त्यांच्यावर सातरस्ता येथील कस्तुरबा रुग्णालयात विशेषत्वाने तयार करण्यात आलेल्या वॉर्डमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. आरोग्य विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे, जालना, औरंगाबाद, बीड, नाशिक आणि मुंबईमध्ये स्वाइन फ्लूची बाधा झालेले नागरिक आढळून आलेले आहेत. आरोग्य विभाग सहसंचालक डॉ. प्रदीप आवटे यांनी मुंबईत दोन नागरिकांना स्वाइन फ्लूची बाधा झाल्याचे मान्य करून राज्यातही काही ठिकाणी लागण झाल्याचे सांगितले. उपचार त्वरित सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून टॅमीफ्लू गोळ्यांचा पुरेसा साठाही असल्याचे त्यांनी सांगितले. लक्षणे दिसल्यास त्वरित जवळच्या सरकारी रुग्णालयात
जावे, असेही त्यांनी सांगितले.