आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत दोन दहशतवाद्यांना अटक; बनावट नोटा - अंमली पदार्थ जप्त

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - हिजबूल मुजाहिदीन दहशतवादी संघटनेच्या दोघांना मुंबई गु्न्हे शाखेने अटक केली आहे. त्यातील एकजण नवी मुंबईचा असून दुसरा काश्मिरचा रहिवासी आहे. त्यांच्याकडून बनावट नोटा आणि अंमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत.

मोहम्मद तालुकदार आणि फारुख नायकू ही अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हिजबूल मुजाहिदीनचे हे दहशतवादी असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. त्यांनी मुंबईसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केली होती. नायकू हा गेल्या दीड वर्षांपासून मुंबईत राहात होता. हिजबूलचा कंमाडर आणि पाकिस्तानच्या लष्करातील उच्चअधिका-यांशी तो संपर्कात होता, असे सुत्रांनी सांगितले आहे. या दोघांकडून आणखी माहीती मिळण्याची शक्यता सह पोलिस आयुक्त गुन्हे शाखा हिमांशू रॉय यांनी सांगितले.