आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Youth Arrested In Delhi In Connection With Acide Attack On Girl

तरुणीवर अ‍ॅसिड हल्ल्या प्रकरणी दोन आरोपींना दिल्लीत अटक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नौदलात भरती होण्यासाठी दिल्लीहून मुंबईत आलेली तरुणी प्रीती राठीवर अ‍ॅसिड हल्ला करणा-या आरोपीसह एका संशयिताला मुंबई पोलिसांनी गुरुवारी रात्री दिल्लीत अटक केली. पवनकुमार असे आरोपीचे नाव आहे.
बीटेकचा विद्यार्थी असलेला पवनकुमार प्रीतीच्या मैत्रिणीचा मित्र आहे. रेल्वे पोलिसांच्या पथकाने या प्रकरणातील दुस-या आरोपीलाही अटक केली असून त्याला रात्री उशिरा मुंबईत आणण्यात येणार आहे. आरोपी पवनकुमार याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येईल.


दोन मे रोजी प्रीती तिचे वडील, मावशी आणि काकासह बांद्रा रेल्वे स्थानकावर उतरले होती. याचवेळी तोंडाला रुमाल बांधलेल्या एकाने प्रीतीवर अ‍ॅसिड फेकले होते. यात तिचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला, तर मावशीही जखमी झाली होती. घटनेनंतर पोलिसांनी संशयित आरोपीचे रेखाचित्र तयार करून सर्व पोलिस ठाण्यांना पाठवले होते.