आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायगड जिल्ह्यातील पाली भुतवली धरणात 2 पर्यटक बुडाले, शोध सुरु

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच धरणात युवक बुडाले आहेत. - Divya Marathi
याच धरणात युवक बुडाले आहेत.
रायगड- कर्जत तालुक्यातील पाली भुतवली धरणामध्ये 2 पर्यटक तरुण बुडाले. ही घटना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. अभिषेक जैन (27), प्रसाद तावडे (30, रा. भाईंदर पश्चिम) अशी धरणात बुडालेल्यांची नावे आहेत. खोपोलीतील आपत्कालीन बचाव समुहाच्या मदतीने दोघांच्या मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
 
मुंबई भाईंदर येथील 12 जणांचा एक समुह कर्जत येथील पाली भुतवली धरणावर शनिवारी पर्यटनासाठी आला होता. त्यानंतर या पर्यटकांनी शनिवारी रात्री धरणाच्याच बाजुला तंबूमध्ये मुक्काम केला. रविवारी सकाळी हे 12 पर्यटक सकाळी साडेसातच्या सुमारास अंघोळीसाठी धरणात उतरले असता, धरणातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अभिषेक जैन व प्रसाद तावडे हे दोघे तरुण पाण्यात बुडाले.
 
धरणामध्ये उतरलेल्या इतर मित्रांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर तेथील काही स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. तसेच खोपोलीतील आपत्कालीन बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. सध्या त्या दोघांचाही मृतदेह शोधण्याचा प्रयत्न सुरू असून, ‍अद्याप दोघांचेही मृतदेह सापडलेले नाहीत.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...