आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलिबाग समुद्रात दोन तरूण बेपत्ता, तिसरा सुदैवाने वाचला; भरतीचा अंदाज न आल्याने दुर्घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलिबाग- कुलाबा किल्ला पाहून किनाऱ्याकडे परत येताना भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दोन तरूण समुद्रात बुडून बेपत्ता झाले आहेत. काल (15 ऑगष्ट) दुपारी दोन वाजेच्या सुमारस घडली. ऋषभ सिव्हा (24, रा.गाेवा) आणि साैरभ खान (23, रा.मध्यप्रदेश) असे बेपत्ता झालेल्या तरूणांची नावे आहेत.

अपघाताची महिती मिळातच शोधकार्य सुरू करण्यात आले, परंतू या शाेध कार्यास यश आले नाही. भरतीच्या प्रवाहा बराेबर दाेघेही तरूण रेवदंडा समुद्र किनाऱ्याकडे वाहात गेले असावेत असा अंदाज काेळी बांधव व्यक्त करत आहेत. दरम्यान अलिबाग विभागीय पाेलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून शोधकार्य सुरू केले.

एका कंपनीत सिव्हील ईंजिनियर म्हणून कार्यरत असलेले पाच मित्र अलिबाग कुलाबा येथे पर्यटनासाठी आले होते. त्यातील तिघेजण कुलाबा किल्ला पहाण्यास गेले. परत येत असताना समुद्रास भरती सुरू झाली. तिघेही पाण्यातून किनाऱ्याकडे येण्यास निघाले. यावेळी प्रवाहाच्या वेगाचा याचा अंदाज न आल्याने साैरभ आणि ऋषभ प्रवाहात वाहत जावून समुद्रात बेपत्ता झाले. त्यांचा तिसरा सहकारी सुरेश स्वामी हा सुदैवाने समुद्र किनारी पाेहाेचला. त्याने अलिबाग पाेलीसांशी संपर्क साधून मित्र वाहून गेल्याचे सांगितले, त्यानंतर पोलिसांनी लगेच शाेध माेहिम सुरू केली.
बातम्या आणखी आहेत...