आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • U.R. Anantmurty News In Marathi, Kannadi Literature, Divya Marathi

मोदी पीएम...अन् त्यांचे देश सोडणे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारताचे ज्येष्ठ साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती आज आपल्यात नाहीत, यावर माझा विश्वास बसत नाही. त्यांच्या सहवासातील अनेक क्षण मला आठवतात. पण ‘जैसा बोले तैसा वागे’ हे त्यांचे वागणे मला सर्वात भावले! विजय तेंडुलकरांप्रमाणे ते आपल्या वागण्या-बोलण्याशी आणि लिखाणाशी प्रचंड प्रामाणिक होते. दोघेही आपल्या भूमिकेपासून कधीच तसूभरही ढळले नाहीत. यामुळेच या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले तर मी भारतात राहणार नाही, असे विधान त्यांनी केले होते.विशेष म्हणजे जसे बोलले तसे त्यांनी खरे करून दाखवले. ते हे जगच सोडून गेले. मोदींबद्दलच्या विधानाचा त्यांना त्रास झाला. पण या जाणत्या साहित्यिकाची त्यामागची तळमळ कोणी जाणून घेतली नाही...

भाषेवर त्यांचे प्रचंड प्रेम होते. इंग्लंडला पदव्युत्तर शिक्षण घेत असताना आपली प्रचंड घुसमट झाली होती. सततच्या इंग्रजीमधील शिक्षणामुळे मी अस्वस्थ झालो. त्यातूनच मी कानडीमधून ‘संस्कार’ नावाची कादंबरी लिहिली, हे मला सांगताना त्यांच्या चेह-यावरील उत्स्फूर्त भाव जसेच्या तसे आठवतात. आपल्या भाषेवरील प्रेमापोटीच त्यांनी कानडीमधून सातत्याने लिखाण केले.
भाषा, संस्कृती, मातीवर खूप खूप प्रेम करणारा हा अवलिया लेखक होता. सामान्य माणसांची वेदना, घुसमट, दु:ख त्यांनी आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून मांडली.

{ संजीव खांडेकर (कवी, चित्रकार)