आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘उचल्या’च्या मुहूर्ताला लेखकाची दांडी, लक्ष्मण गायकवाड नाराज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- इंग्रज सरकारने ‘गुन्हेगार’ म्हणून शिक्का मारल्यानंतर स्वतंत्र भारतात ‘भटके विमुक्त’ अशा सरकारदरबारी कागदोपत्री ओळखीखेरीज ना जात, ना गाव, ना घर, ना शेत अशा अवस्थेत गावोगाव भटकणाºया जमातीची कहाणी म्हणजे ‘उचल्या’. लक्ष्मण गायकवाड लिखित ‘उचल्या’ या मन दुभंगणाºया आत्मचरित्रावर चित्रपटाचा मुहूर्त मुंबईत पार पडला. मात्र खुद्द लेखकानेच या मुहूर्ताकडे पाठ फिरवली.
लक्ष्मण गायकवाड यांच्या गाजलेल्या ‘उचल्या’ या आत्मचरित्रात चित्रपटाला उपयुक्त असा सारा मालमसाला असल्याने त्यावर चित्रपट करण्याचा मोह निर्माते अमर कक्कड आणि पुष्पा कक्कड यांना झाला. चित्रपटासाठी लेखक लक्ष्मण गायकवाड यांची रीतसर परवानगी घेऊन वर्ष लोटले तरीही चित्रपटाची संहिता आणि इतर जमवाजमव सुरू झाली नसल्याने लक्ष्मण गायकवाड यांनी आपली नाराजी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली. मुंबईत झालेल्या ‘उचल्या’च्या मुहूर्ताला अभिनेते सचिन खेडेकर, निर्माते अमर आणि पुष्पा कक्कड, दिग्दर्शक समीत कक्कड तसेच सिनेफोटोग्राफर संजय जाधव उपस्थित होते. ‘बाबू बॅण्ड बाजा’ फेम विवेक चाबुकस्वार हा बालकलाकार प्रमुख भूमिका करणार आहे.
-गेल्या वर्षीच निर्मात्याने माझ्याकडून हे हक्क विकत घेतले होते. मात्र वर्षभरानंतर काहीच हालचाल झाली नसल्याने पत्रकार परिषदेत गेलो नाही. निर्माते आणि दिग्दर्शकावर माझा विश्वास आहे. ते नक्कीच चांगली कलाकृती सादर करतील याची मला खात्री आहे, परंतु 'उचल्या' हे पुस्तक मी सामाजिक परिवर्तनासाठी आणि फुले, आंबेडकरवाद लोकांसमोर यावा यासाठी लिहिले आहे. चित्रपटातून तो आशय ठळकपणे यावा हीच माझी अपेक्षा आहे. योग्य संहिता आणि स्टारकास्ट एकदा फायनल झाली की मी स्वत: चित्रपटात लक्ष घालीन. - लक्ष्मण गायकवाड, लेखक