आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंचा एलबीटीला विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापाठोपाठ आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही बुधवारी एलबीटीला विरोध दर्शवला. जकातीला पर्याय देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महापालिकांचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञांची मदत घ्यावी, अशी सूचना करतानाच व्यापा-यांनीही दुकाने बंद ठेवून लोकांना वेठीस धरू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
व्यापा-यांच्या शिष्टमंडळाने उद्धव यांची भेट घेतल्यानंतर ते म्हणाले की, सध्याच्या पद्धतीने एलबीटीची अंमलबजावणी मुंबईसारख्या मोठ्या शहरात शक्य नाही. जकातीच्या माध्यमातून मुंबईला रोज 10 ते 15 कोटी रुपये उत्पन्न मिळते. हा विषय सध्या बाजूला ठेवून सरकारने दुष्काळ, पाणी अशा गंभीर प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला. महालक्ष्मी रेसकोर्सच्या भाडेकराराची मुदत 31 मे रोजी संपत आहे. त्या जागी लोकांसाठी काही थीम पार्क बांधावे, अशी मागणीही त्यांनी केली.