आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरे होणार शिवसेनेचे अध्यक्ष; आदित्यकडे कार्याध्यक्षपद?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे येत्या बुधवारी (२३ जानेवारी) शिवसेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याची शक्यता आहे. उद्धव यांचे चिरंजीव व युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे कार्याध्यक्षपद सोपविले जावू शकते.
येत्या बुधवारी म्हणजे २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस असून, त्यादिवशी ही जबाबदारी उद्धव आणि आदित्य यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे आमच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे गेल्या वर्षी १७ नोव्हेंबर रोजी निधन झाले आहे. त्यानंतर शिवसेना या पक्षाची व संघटनेची संपूर्ण जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे आली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखपदी बाळासाहेब ठाकरेच राहतील, असे जाहीर केले आहे. त्यामुळे सध्या कार्यप्रमुख असलेले उद्धव आता पक्षात नवे पद निर्माण करुन स्वत: अध्यक्ष होतील. याचबरोबर त्यांचे चिरंजीव आदित्य यांच्याकडे कार्याध्यक्षपद सोपविले जावू शकते. याबाबतची अधिकृत घोषणा बुधवारी (२३ जानेवारी) होणार असल्याचे कळते.