आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यंगचित्राचा वाद : शिवसेनेचे ‘डॅमेज कंट्रोल’; उद्धव राज्यपालांना भेटणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनेच्या मुखपत्रामधून मराठा मूकमोर्चाची व्यंगचित्राच्या माध्यमातून िखल्ली उडवण्यात आल्याने गेले दोन िदवस या सत्ताधारी पक्षाची प्रचंड कोंडी झाली. ही काेंडी फोडण्यासाठी तसेच मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: िशष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी. िवद्यासागर राव यांची भेट घेणार आहेत. याच संदर्भात बुधवारी दुपारी मातोश्रीवर बैठक झाली. शिवसेनेच्या मंत्र्यांना तसेच आमदारांना गुरुवारी मुंबईत राहण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या असल्याचे समजते.

मराठा मोर्चावर व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याने दोन िदवस िशवसेनेचे मुखपत्र तसेच पक्षावर राज्यातून जोरदार टीका झाली. याचबरोबर मुखपत्राच्या नवी मुंबई तसेच ठाण्यातील कार्यालयावर हल्लेही झाले होते. हे कमी की काय, म्हणून शिवसेना आमदार तसेच खासदारांनी
राजीनामे िदल्याचे वृत्त सर्वत्र पसरल्याने पक्षात एकच खळबळ उडाली. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी “शिवसेनेच्या िवरोधात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची ही खेळी आहे’, असे सांगून नामानिराळे होण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही ही धग कायम असल्याचे पाहून उद्धव ठाकरे यांनी तातडीने बुधवारी मातोश्रीवर बैठक बोलावली.

िशवसेनेने कधीही जातीपातीचे राजकारण केलेले नाही. एका व्यंगचत्रामुळे इतक्या वर्षांची पक्षाची ओळख दोन िदवसांत बदलणार असेल तर ते परवडणारे नाही. याचा िवचार करून आता शिवसेनेच्या नेत्यांनी वक्तव्ये करण्यापेक्षा आपण स्वत: बाहेर पडणे गरजेचे असल्याचे ठरवून उद्धव यांनी मुख्यमंत्री व राज्यपालांना भेटण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खासदार, अामदारांच्या राजीनाम्याचे वृत्त खोटे
खासदार, आमदारांनी राजीनामे दिल्याने िशवसेनेला हादरा असेे वृत्त पसरवून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र तसे काही झाले नव्हते. कोणीही राजीनामेे िदले नाहीत. त्या अफवा होत्या. शिवसेनेत माझ्यासह अनेक मराठा मंत्री, खासदार, आमदार आहेत. आमचा पक्ष जातपात मानत नाही. मराठा समाजाला अामचा पाठिंबा आहे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ िशंदे म्हणाले.
शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी घर न देणारे माफी काय मागणार?
विखेंची उद्धव यांच्यावर टीका
‘सामना’तील वादग्रस्त व्यंगचित्रप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त करण्यास दिलेला नकार आश्चर्यजनक नाही. वडील व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी बाळासाहेबांचेच घर असलेले मातोश्री देण्याचा मनाचा मोठेपणा उद्धव ठाकरे दाखवू शकले नाहीत; ते लोकांची माफी मागण्याचे काय औदार्य दाखवणार? अशी घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. विखे म्हणाले, स्वत: माफी न मागता उद्धव यांनी व्यंगचित्रकाराच्या माफीनाम्यावर बोळवण करण्याचा प्रयत्न केला. माफी मागितल्याने माणूस लहान होत नाही हे कदाचित त्यांना ज्ञात नसावे, असाही टोला त्यांनी लगावला.
हे पण वाचा - शिवसेनेची कोंडी
बातम्या आणखी आहेत...