आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Meet Shital Mahatre & Subha Raual At Mumbai

शीतल म्हात्रे, राऊळ यांनी उद्धवची घेतली भेट, घोसाळकरांवर कारवाईचे दिले आश्वासन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दहिसर परिसरातील शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांनी आपल्याच पक्षातील नगरसेविकांची गळचेपी केल्याबद्दल नाराज असलेल्या शीतल म्हात्रे व शुभा राऊळ, मनिषा चौधरी यांनी आज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या महिला नगरसेविकांनी उद्धव यांची मातोश्रीवर तब्बल दीड तास सविस्तर चर्चा केली. यावेळी आमदार घोसाळकर यांच्यावर कारवाई करू असे आश्वासन दिले असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
दरम्यान, आपली पक्षावर कोणतेही नाराजी नाही. तसेच पक्षातील काही नेत्यांनी आमच्यावर आरोप-प्रत्यारोप केले त्याबद्दल उद्धव यांना संपूर्ण माहिती दिली आहे असेही म्हात्रे यांनी स्पष्ट केले. तसेच घोसाळकरांविरूद्ध पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीचा आपण पाठपुरावा करीत राहू, असेही म्हात्रे यांनी स्पष्ट केले.