आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Present On Thackeray's Death Willing, Advocate Confessed In High Court

ठाकरेंच्या मृत्युपत्रावेळी उद्धव यांचीच उपस्थिती, वकिलांची उच्च न्यायालयात साक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मृत्युपत्र तयार करताना त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्याव्यतिरिक्त अन्य काेणीही नातेवाईक किंवा कायदेशीर वारस उपस्थित नव्हते,’ अशी साक्ष हे मृत्युपत्र तयार करणा-या वकिलांनी बुधवारी उच्च न्यायालयासमोर दिली.

बाळासाहेबांच्या मृत्युपत्रात थोरला मुलगा जयदेव यांचा उल्लेखही नाही. त्यामुळे या मृत्युपत्राला आक्षेप घेणारी याचिका जयदेव ठाकरे यांनी सादर केली आहे. मृत्युपत्र तयार करताना उपस्थित असलेले अ‍ॅड. एफ. डिसुझा यांची जयदेव यांच्या वकील सीमा सरनाईक यांनी बुधवारी न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्यासमक्ष उलटतपासणी घेतली. ‘मृत्युपत्र तयार करताना उद्धव ठाकरे, अनिल परब, शशी प्रभू, ज्येष्ठ विधिज्ञ तथा माजी खासदार अधिक शिरोडकर व बाळासाहेबांचे स्वीय सहायक रवींद्र म्हात्रे एवढेच लाेक उपस्थित होते,’ अशी माहिती डिसुझा यांनी दिली.
‘मृत्युपत्रावर सही घेताना इतर कुटुंबीयांचीही उपस्थिती आवश्यक असल्याचे तुम्ही उद्धव ठाकरे किंवा उपस्थितांना का सांगितले नाही?’ असा प्रश्न सरनाईक यांनी केला. त्यावर ‘मी शिरोडकरांकडे तशी विचारणा केली होती, मात्र कायद्याने इतरांची उपस्थिती बंधनकारक नसल्याचे त्यांनी मला सांगितले होते,’ असे उत्तर डिसुझा यांनी दिले. बाळासाहेबांनी आपले मृत्युपत्र देवनागरी भाषेत लिहिले होते व त्याखाली दिनांक टाकून सही केल्याचेही डिसुझा यांनी सांगितले.