आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे बंधू 'मैदानात': उद्धव यांच्याकडून मेट्रो-3 ची पाहणी तर राज आयुक्तांच्या भेटीला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईकरांना भेडसवणा-या विविध प्रश्नांविषयी ठाकरे बंधू आता मैदानात उतरलेले दिसत आहेत. एकीकडे, मुंबईत रेल्वे पुलावर व इतरत्र असलेल्या फेरीवाल्यांना हटविण्याबाबत राज ठाकरे मुंबई महापालिकेचे आयुक्त अजेय मेहता यांच्या भेटीला गेले आहेत तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेट्रो-3 या प्रकल्पाची पाहणी केली.
 
मागील महिन्यात एलफिन्स्टन पुलावर चेंगराचेंगरीत २३ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राज ठाकरेंनी संताप मोर्चा काढत मुंबईतील रेल्वे पुल व रस्त्याच्या कडेला असलेल्या फेरीवाल्यांना १५ दिवसात काढा नाहीतर १६ व्या दिवशी मनसे स्टाईलने काम करू असा इशारा दिला होता. त्यानंतर फेरीवाल्यांबाबत महापालिकेचे नेमके काय धोरण आहे आणि यातून मार्ग कसा काढायचा याची माहिती घेण्यासाठी राज ठाकरे आज अजेय मेहता यांच्या भेटीला गेले होते अशी माहिती समोर येत आहे.
 
उद्धव ठाकरे यांनीही मेट्रो-३ प्रकल्पामुळे मराठी लोकांच्या घरांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगत आधी त्यांचे पुर्नवसन करा मगच तेथून प्रकल्प न्या असे भाजपला सांगितले आहे. यावर सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मेट्रो-३ ची पाहणी करून लोकांच्या भावना व प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मराठी लोकांशी संवाद साधला.
बातम्या आणखी आहेत...