आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav raj Thackeray Meeting Saamana Gives Frontline News

उद्धव-राज भेटीनंतर \'अब आयेंगे अच्छे दिन\'चा \'सामना\'तून मराठीजणांना संदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्कवर गेल्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले होते. याची सोमवारपासून राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरु असतानाच शिवसेनेचे मुखपत्र सामनातून याला ठळक प्रसिद्धी दिली आहे. 'उद्धवजी आणि राज स्मृतिस्थळावर एकत्र, अब आयेंगे अच्छे दिन' असे शब्द सामनात वापरले गेले आहेत. दरम्यान, मोदींनी भारतातील जनतेला 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवले होते. मात्र, मोदींनी मराठी लोकांवर अन्याय केल्याची भावना सेनेची आहे. आता उद्धव व राज एकत्र आल्याने 'अब आयेंगे अच्छे दिन' असा संदेश शिवसेनेला मराठीजणांना व आपल्या पाठीराख्यांना द्यायचा आहे.
पुढे वाचा, उद्धव व राज यांच्या भेटीबाबत 'सामना'ने नेमके काय म्हटले आहे...
उद्धवजी आणि राज स्मृतिस्थळावर एकत्र, अब आयेंगे अच्छे दिन- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शिवतीर्थावर आले. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाली तेव्हा उपस्थित असलेल्या हजारो शिवसैनिक आणि मनसैनिकांनी एकच गजर केला... ‘एकत्र या, एकत्र या... गरज आहे’... नंतर दिवसभर मीडियात ‘उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र’ अशीच चर्चा रंगली होती. ‘अब आएंगे अच्छे दिन’ हीच भावना शिवतीर्थापासून प्रसारमाध्यमांच्या कार्यालयापर्यंत होती.
राज ठाकरे शिवतीर्थावर आले त्यावेळी उद्धव ठाकरेही तेथे उपस्थित होते. राज यांनी स्मृतिस्थळावर नतमस्तक होऊन शिवसेनाप्रमुखांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. हस्तांदोलन केले. दोन्ही भावांची चर्चा सुरू होती त्याचवेळी राजकारणापेक्षा रक्ताची नाती घट्ट असतात अशी बे्रकिंग न्यूज मीडियाने सुरू केली. शिवतीर्थावरील दृश्य पाहून तेथे उपस्थित असलेल्या शिवसैनिक व मनसैनिकांमध्ये प्रचंड आनंद पसरला होता. दोन्ही भावांनी एकत्र यावे, ती गरज आहे अशा प्रतिक्रियाही अनेकांनी प्रसारमाध्यमांना दिल्या. वृत्तवाहिन्यांनी दिवसभर हे दृश्य महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवले. राज यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीवर ठेवलेला हात, तेजस ठाकरे यांच्याशी केलेले हस्तांदोलन या ‘बॉडी लँग्वेज’चा अर्थ काढत वृत्तवाहिन्यांवर चर्चा झडल्या. तिकडे टी.व्ही.वर आणि इकडे राज्याच्या प्रत्येक घरात हीच चर्चा सुरू होती... उद्धव ठाकरे आणि राज एकत्र येणार... त्यांनी एकत्र यावे! राज यांच्यासोबत मनसेचे शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर हे नेतेही आले होते.
पुढे पाहा 'सामना'त कसे स्थान दिले आहे उद्धव-राज यांच्या भेटीला...