आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनाध्यक्ष होताच उद्धव यांनी सुनावले; पक्ष सोडायचा आहे, त्यांनी खुशाल जावे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नाराज असेल त्याने आपली नाराजी माझ्यापर्यंत पोहोचवावी आणि ज्यांना पक्ष सोडून जायचे आहे त्यांनी आताच जावे, अशा शब्दांत शिवसेनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पदाधिका-या ना सुनावल्याचे समजते. शिवसेना भवनात झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत उद्धव ठाकरे यांची एकमताने अध्यक्षपदी निवड झाली. या वेळी ते म्हणाले, पक्षात लोकशाही असली तरी मी फालतू लोकशाही खपवून घेणार नाही. पक्षात काही लोकांची नाराजी आहे. माझ्यापर्यंत ही माहिती येते. त्यांनी थेट माझ्याशी बोलावे. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर पक्ष संपेल असे म्हणणा-या ना सुनावताना त्यांनी काँग्रेसची स्थापना करणा-या ह्यूम यांचे निधन झाले; पण काँग्रेस संपली काय, असा सवाल केला. बैठकीला उपस्थित सूत्रांनी ही माहिती दिली.