आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत महापाैर सेनेचाच! उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांसमोर भाजपला ठणकावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेली २० वर्षे मुंबई पालिकेत साथ-साथ सत्ता उपभोगत असलेल्या शिवसेना-भाजपत सध्या देश व राज्याच्या सत्तेत एकत्र असूनही फारसे सलाेख्याचे संबंध नाहीत. या पार्श्वभूमीवरच फेब्रुवारीत होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही मित्रपक्ष एकमेकांची उणीदुणी काढण्यात मग्न आहेत, त्याची झलक साेमवारीही दिसून अाली.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी पालिकेत एकत्र आले होते. या वेळी उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच ‘पालिकेवर पुन्हा भगवा फडकवा’ असे आवाहन करत मुंबई पालिकेत तरी शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचे भाजपला अप्रत्यक्ष सुनावले. ‘पालिकेच्या कारभारावर आरोप करणारे मुंबईत कावळे बरेच आहेत,’ अशी बोचरी टीकाही त्यांनी भाजप नेत्यांवर केली.
  
बाळासाहेब ठाकरे यांचे िपता प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण साेमवारी मुंबई महापालिकेच्या सभागृहात झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरे व फडणवीस एकाच व्यासपीठावर अाले हाेते. ‘आचारसंहिता लागण्यापूर्वी पालिकेत आलोय. शिवसेनेचा महापौर बसवण्यास मार्चमध्ये परत येईन. पालिका निवडणुकीत शिवसेनेचा विजय होईल,’ असा विश्वासही उद्धव यांनी या वेळी व्यक्त केला.    

‘सामाजिक विषमता संपवण्यासाठी प्रबोधनकारांनी लढा दिला. समाज सुधारण्यासाठी त्यांचे विचार प्रेरणादायी आहेत. ते आपण आत्मसात करून नव्या वर्षाचा संकल्प करूया,’ असे मुख्यमंत्री म्हणाले. जातीयता आणि चुकीच्या प्रथा-परंपरा, हुंडाबंदीबाबत प्रबोधनकारांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन काम केले, असे सांगतानाच या प्रबोधनकारांचे तैलचित्र लावायला आम्हाला उशीर झाला, अशी खंतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. एरव्ही मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात मात्र सावध पवित्रा घेत काेणतेही वादग्रस्त वक्तव्य करणे टाळले. तसेच अागामी निवडणुकीतील युतीसंदर्भातही काहीच संकेत दिले नाहीत. शिवसेनेने मात्र अापलीच सत्ता कायम राहील, हे ठणकावून सांगितले.  

या कार्यक्रमास महापौर स्नेहल आंबेकर, उपमहापौर अलका केरकर, शिवसेना खासदार अरविंद सावंत, पर्यावरणमंत्री रामदास कदम, खासदार राहुल शेवाळे, खासदार अनिल देसाई, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते.  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...