आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Uddhav Thackeray And Shahrukh Khan Among Water Bill Defaulters

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्धव ठाकरेंसह शाहरुख खान डिफॉल्टर; बीएमसीतर्फे थकबाकीदारांची यादी जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बृहन्मुंबई महानगर पालिकेने (बीएमसी) पाणीपट्टी न भरणार्‍यांची यादी जाहीर केली आहे. यात चक्क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बॉलिवूडचा किंगखान अर्थात शाहरुख खान याचे नाव झळकले. आहे. विशेष म्हणजे बीएमसीने जाहीर केलेल्या डिफॉल्टरांच्या यादीत दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही नाव आहे. बीएमसीने 26 जून रोजी थकबाकीदारांची यादी आपल्या संकेतस्थळवर प्रसिद्ध केली.
माहिती आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, बीएमसीने पाणीपट्टी न भरणार्‍या रहिवाशांची यादी जाहीर केली आहे. एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले, की पाण्याची थकबाकी असणार्‍या रहिवाशांची नावे या यादीत आहेत. बील पाठवून 45 दिवस उलटले तरी या थकबाकीदारांनी बिलाची रक्कम बीएमसीच्या कार्यालयात भरली नाही.

सूत्रांनी सांगितले, की थकबाकीदारांची यादी 24 तासांमधून एकदा अपडेट केली जाते. प्रशासनाला कोणालाही नाराज करायचे नाही. थकबाकीदारांना पाणी बिलाची रक्कम भरण्याचे आवाहन करण्‍यात आले आहे. बिलाची रक्कम भरल्यानंतर संबंधितांचे नाव यादीतून वगळण्यात येईल, अशीही माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.
बीएमसीतर्फे दोन टप्प्यात पाणी बिले पाठवली जातात. बिलाच्या थकबाकीची रक्कम 15,000 रूपये झाल्यानंतर 30 दिवसांनंतर बिल पाठवले जाते. एप्रिल 2001 पूर्वी बीएमसीतर्फे बिल भरण्यासाठी दिलेली मुदत समाप्त झाल्यानंतर तीन दिवसांची नोटीस बजावण्‍यात येत होती. त्यानंतर ग्राहक बिलाचा भरणा करत नसेल तर नळ कनेक्शन तोडले जात होते. आता 45 दिवसांत पाणीबिल भरले नाही, तर बीएमसी डिफॉल्टर ग्राहकांची नावे प्रसिद्ध करते.