मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीका करण्याची एकही संधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोडत नाहीत. मंगळवारी रात्री भारतीय कामगार सेनेच्या मेळाव्यातही त्यांनी हीच भूमिका कायम ठेवली. ‘सरकारकडे आशेने पाहणाऱ्या जनतेला सगळीकडे धोका दिसत असून देशात प्रचंड अस्थिरता अाहे. ब्रिटनमध्ये तीन मोठे उद्योग बंद पडल्याबरोबर तेथील पंतप्रधान सुटीवरून परतले, आपल्याकडे असे होईल का?’ असा सवालही त्यांनी माेदींचे नाव न घेता उपस्थित केला.
ठाकरे म्हणाले, ‘सीमेवरील जवानांसह देशातील शेतकऱ्यांची, कामगारांची अवस्था बिकट झाली आहे. सरकारला कामगारांशी काहीही देणे-घेणे नाही. इथे जनता घामाचा पैसा बँकेत डिपॉझिट करते. तोच पैसा घेऊन मल्ल्यासारखे पसार होतात. मोठ्या अपेक्षेने ज्यांना निवडून दिले तेच जनतेवर कर लादताहेत. गरज नसलेल्या गाेष्टींना करमाफी आणि गरजेच्या वस्तूंवर कर लादला जातोय. पेट्रोल, डिझेल महागले; भाज्या, धान्य महाग, अशा महागाईत जगायचे कसे?’ असा प्रश्नही ठाकरेंनी केला.
संघ आणि मुख्यमंत्री यांच्या भारतमाता की जय घोषणेची खिल्ली उडवताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘भारतमाता की जय जाे म्हणणार नाही, त्याला देशात राहण्याचा अधिकार नाही’, असे बोलले जातेय. मग वाट न पाहता न बोलणाऱ्यांची गचांडी धरून त्यांना बांगलादेश, पाकिस्तानात फेकून द्या.’
पुढील स्लाइडवर, माेदींनी नाकारली शिवसेना खासदारांना भेट