आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Attack On Sharad Pawars Dual Stand On Gujrat Riots

शरद पवार, गुजरात दंगलीबाबत नव्हे आधी गोवारी हत्याकांडाबद्दल बोला- उद्धव ठाकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सत्तेसाठी हापापलेले नेते असून, कधी इकडे तर कधी तिकडे अशा दुहेरी भूमिका घेतात. एकदा मोदींना क्लिन चिट देतात तर कधी त्यांना जबाबदार धरतात. गुजरातच्या दंगली झाल्या हे खरे पण तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात लातूरमधील गोवारी हत्याकांडाबाबत का बोलत नाही, असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी पवारांवर केला.
उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारासाठी नवी मुंबईतील ऐरोली येथे सभा घेतली. यावेळी माजी प्रशासकीय अधिकारी विजय नहाटा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच ठाणे व कल्याणमधील शिवसेनेचे दोन्ही शिलेदार विजयी होतील असा विश्वास उद्धव यांनी व्यक्त केला. ठाकरे म्हणाले, सध्या महायुतीसाठी चांगले वातावरण आहे. त्यामुळेच मला ठाणे व कल्याण या दोन्ही जागांवर सेनेचे खासदार हवे आहेत. मात्र काही जणांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी करण्याची सुपारी घेतली आहे. मात्र, शिवसेना सेटिंग करणारा पक्ष नाही असे सांगत उद्धव यांनी राज ठाकरेंचे नाव घेता टीका केली.
पुढेे वाचा, शरद पवारांवर हल्लाबोल...
बबनराव घोलप आणि अडवाणींबाबत उद्धव काय म्हणाले...