आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेबांनी मोठी केलेली माणसं घेऊन पवारांची चूल, उद्धव ठाकरेंची सणसणीत टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनाप्रमुखांनी मोठी केलेली माणसं घेऊन शरद पवारांनी राजकारणाची चूल मांडली, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
या वेळी त्यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसवर जोरदार टीका केली. उद्धव म्हणाले, शरद पवारांनी वांद्रे पोटनिवडणुकीत नारायण राणेंना पाठिंबा देत माणुसकी दाखवली नाही. राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार यापुढे कधीच सत्तेत येणार नाही. बंडखोरी केलेल्या सर्वांची शिवसेनेतून हकालपट्टी करणार आहोत, असेही त्यांनी या वेळी जाहीर केले. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचीही उपस्थिती होती.