आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tobbaco Consumption Statement, Uddhav Thackeray Critics On Bjp Mp Dilip Gandhi Thorugh Saamana

तोंडाने घाण टाकू नका, \'तंबाखू\'वरून दिलीप गांधींवर \'सामना\'तून खोचक टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- तंबाखूमुळे कॅन्सर होतो हा समज चुकीचा आहे, असे ज्ञानकण नगरचे खासदार दिलीप गांधींनी उधळले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी हातात झाडू घेतला आहे तो रस्त्यावरील कचरा साफ करण्यासाठी, पण जे लोक तोंडाने घाण करीत आहेत त्यांच्या तोंडातील घाण कशी साफ करणार? अशा शब्दात भाजपचे खासदार दिलीप गांधींचा खरपूस समाचार घेतला आहे. तंबाखूमुळे कॅन्सर होत नाही या अचाट शोधाबद्दल गांधी यांना या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार द्यायला हरकत नाही. तंबाखूचे माहात्म्य सांगून देशातील तंबाखू व गुटखा लॉबीवर प्रचंड उपकार केले आहेत अशीही टीका करण्यात आली आहे.
‘‘तंबाखूमुळे कॅन्सर होतो हा समज चुकीचा आहे,’’ असे वक्तव्य खासदार दिलीप गांधी यांनी केले होते. त्यावरून देशभर सर्वच स्तरातून गांधींवर टीका होत आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही गांधींना फैलावर घेत संसदेत त्यांच्या अहवालाची चिरफाड करू असे म्हटले आहे. शिवसेनेने मंगळवारी सामनातून अग्रलेख लिहून खासदार गांधींवर सडकून टीका केली.
अग्रलेखात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांनी स्वपक्षीय नेते, मंत्री, खासदार वगैरे मंडळींच्या वागण्या-बोलण्यावर लगाम घातला आहे. तरीही काही लोक तोंडास येईल ते बोलत असतात. साध्वी प्राची, गिरीराज सिंह व आता महाराष्ट्राच्या नगर जिल्ह्यातील खासदार दिलीप गांधी यांना हा ‘वाचाळकी’चा सन्मान प्राप्त झाला आहे. दिलीप गांधी यांनी तंबाखूच्या बाबतीत जे ज्ञानामृत पाजले आहे त्यामुळे मोदी यांना टीका सहन करावी लागत आहे. तंबाखूमुळे कॅन्सर होतो यास कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचा दावा गांधी यांनी केल्याने देशातलेच नव्हे तर जगातले सर्व शास्त्रज्ञ, डॉक्टर मंडळी मूर्च्छा येऊन पडली आहेत व त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी नाकासमोर कांदा नाही तर तंबाखूची पुडी धरावी लागली आहे.
तंबाखूमुळे कॅन्सर होत नाही या अचाट शोधाबद्दल गांधी यांना ते डॉक्टर वगैरे नसले तरी या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार द्यायला हरकत नाही. खासदार गांधी यांनी संशोधनाचा पुढचा टप्पा गाठत समस्त तंबाखूविरोधकांना चीत केले आहे. ‘‘तंबाखूमुळे कॅन्सर होत नाही. उलट तंबाखूमुळे अन्न पचन होते,’’ असे संशोधन गांधी यांनी कधी केले व या संशोधनाबाबत त्यांचा शास्त्रीय आधार काय, हे विचारण्याची सोय नाही, पण गांधी यांनी तंबाखूचे माहात्म्य सांगून देशातील तंबाखू व गुटखा लॉबीवर प्रचंड उपकार केले आहेत. त्यामुळेच पुण्यातील पान असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी नगर येथे जाऊन दिलीप गांधी यांचा सत्कार केला अशी टीका केली आहे.
पुढे आणखी वाचा, दिलीप गांधींवर कशा शब्दात केली आहे टीका....