आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Critics On Cm Fadanvis & Bjp At Saamana Editorial

...तर संपूर्ण विदर्भाचा ‘भंडारा-गोंदिया’ होईल- उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 15 जूनपर्यंत शेतक-यांच्या नुकसानीचा पंचनामा करून त्यांच्या आधीच्या कर्जाचे पुनर्गठन होऊन त्यांना कर्ज मिळेल असा मुख्यमंत्र्यांचा शब्द होता, पण मदत नाही, कर्ज नाही व चूलही पेटत नाही. अशा कोंडीत सापडलेल्या हजारभर शेतकर्‍यांनी वर्षभरात आत्महत्या केल्या असतील तर संपूर्ण विदर्भाचा ‘भंडारा-गोंदिया’ व्हायला वेळ लागणार नाही. विदर्भातील खदखद भंडारा तसेच गोंदिया जिल्हा परिषदेच्या निकालातून बाहेर पडली हे सत्य स्वीकारले तर येणारा काळ कठीण आहे असे भाकीत आम्ही आजच करीत आहोत, असा रोखठोक इशारा शिवसेनेने मित्रपक्ष भाजपला दिला आहे. यानिमित्ताने शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा कोंडीत पकडले आहे.
भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची साफ धूळधाण उडाली असून तेथे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाली आहे. विदर्भाचा संपूर्ण कौल लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या बाजूने होता. खासकरून विधानसभा निवडणुकीत विदर्भ भाजपच्या बाजूने उभा राहिला व विदर्भामुळेच भाजपचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या गादीवर बसला, पण त्याच विदर्भातील पहिल्या महत्त्वाच्या निवडणुकीने भाजपास धक्का दिला आहे. नेमकी हीच संधी साधून शिवसेनेने मित्रपक्ष भाजपला झोडण्याची संधी गमावली नाही. याचद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर टीका केली आहे. 'सामना'त यावर अग्रलेख लिहून शिवसेनेची आगामी दिशा काय आहे हे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्रीही बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी ठरताहेत काय अशी भीती व्यक्त केली आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, भंडारा आणि गोंदियातील जनतेने राष्ट्रवादी व कॉंग्रेसला स्वीकारले, याचा कोणी काय घ्यायचा तो अर्थ घेऊ द्या, पण महाराष्ट्रासाठी हे लक्षण बरे नव्हे व हा शुभशकून नव्हे ही आमची खंत आहे. आजच्या राजवटीपेक्षा आधीचे लोक बरे होते या वैफल्यातून या दोन्ही ठिकाणचा निकाल लागला असेल तर महाराष्ट्राचे समाजमन ओळखून सरकारला पावले उचलावी लागतील. भंडारा तसेच गोंदियात पैशांचा पाऊस पाडला म्हणून कॉंग्रेस-राष्ट्रवादीने यश मिळवले ही सारवासारव आता करता येणार नाही. याच भंडारा तसेच गोंदियात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत पैशांचा पाऊस पाडूनही राष्ट्रवादीचे श्रीमंत व तालेवार उमेदवार पडले होते. त्यामुळे फक्त पैशानेच सर्वकाही सदासर्वकाळ जिंकता येते हे सत्य नाही. भंडारा-गोंदियाचा निकाल हा निदान विदर्भाची जनभावना समजायला हवी, असे सांगत जागे व्हा हा सल्ला दिला आहे.
पुढे आणखी वाचा, मुख्यमंत्र्यांवर कशी केली आहे टीका....