आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंना महाराष्ट्राची वाट लावायची आहे- उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मनसेला स्वत:चे असे काही अस्तित्त्व नाही. त्यामुळेच गेली आठ वर्षे मी पक्षाची वाट काढली आहे असे सांगावे लागत आहे. आता ते सर्वांची वाट लावण्याची भाषा करीत आहेत. यामुळे त्यांना महाराष्ट्राची वाट लावायची आहे असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर केला आहे.
उद्धव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मनसे द्वेषाचे राजकारण करीत आहे. मराठी माणसांना फोडण्याचा त्यांचा डाव आहे. मराठी माणसांना फोडून त्यांना महाराष्ट्राची वाट लावायची आहे. मनसेला स्वत:चे असे काही अस्तित्त्व नाही.
त्यांच्याकडे कोणताही विचार, अजेंडा नाही. सेनेला अडचणीत आणण्याचे काम ते आता करीत आहे. मनसे स्थापन केली तेव्हा त्यांनी बाळासाहेबांचा मुखवटा वापरला मात्र खुद्द बाळासाहेबांनीच फटकारले. आता मनसेला मते मिळणार नाहीत म्हणून ते मोदींच्या नावाचा मुखवटा वापरत आहेत, अशी टीका केली आहे.