आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Critics On Sharad Pawar\'s Statement On RSS

लेंग्याची सुटलेली नाडी आधी संभाळा, शरद पवारांच्या \'अर्धी चड्डी\'वर उद्धवचा हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशाला भरजरी वस्त्रात सजवायचे असेल, जनतेच्या अंगावर वस्त्र हवे असेल तर देशात अर्धी चड्डीवाल्यांचेच राज्य आणावे लागेल. हाफ चड्डीवाल्यांना अयोध्येत राम हवा आहे तर फुल चड्डीवाल्यांना पुन्हा बाबराचे आक्रमण हवे आहे, अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल सुरू केला आहे. श्रीमंत शरद पवारांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या लेंग्याची सुटलेली नाडी सांभाळावी, असाही शाब्दिक हल्ला केला आहे.
शरद पवारांनी दोन दिवसापूर्वी कल्याण- ठाण्यातील एका सार्वजनिक सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपवर टीका करताना असल्या अर्ध्या चड्डीवाल्यांच्या हातात देश देणार का अशी टीका केली होती. स्वातंत्र्य चळवळीशी कसलाही संबंध नसलेल्या संघाच्या हाती सत्ता देऊ नये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हाती सत्ता गेल्यास देशाचा कारभार यशस्वी होणार नाही. अशा स्थितीत अर्ध्या चड्डीवाल्यांच्या हाती सत्ता देणार का? असा प्रश्‍न शरद पवार यांनी विचारला होता. त्याला उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून प्रत्त्युत्तर देत शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, शरद पवार सध्या तोंडास येईल ते बोलत आहेत व बेतालपणे वागत आहेत. पराभव समोर दिसत असल्याने त्यांचा प्रख्यात तल्लख मेंदू काम करेनासा झाला आहे. संघाच्या बाबतीत इतिहास काय सांगतो हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. सरदार पटेल यांनी संघास राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र दिले आहे व स्वातंत्र्योत्तर काळात येनकेन कारणाने संघावर टाकलेल्या बंद्या न्यायालयात टिकल्या नाहीत व ‘हाफ चड्डी’वाल्यांचे कार्य देशात जोमाने सुरू राहिले. स्वत: महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांना भेटी दिल्या होत्या. संघकार्यास गांधीजींनी आशीर्वादही दिला होता. इतकेच नव्हे तर देशावर स्वातंत्र्याचा सूर्य उगवत असताना मुस्लिमांनी ज्या प्रकारची झुंडशाही व गुंडगिरी सुरू केली होती त्या अत्यंत भीषण पर्वात संघ स्वयंसेवकांनी कॉंग्रेस नेत्यांचे संरक्षण केल्याचे दाखलेही इतिहासात सापडतात. त्यामुळे मोदींपेक्षा इतिहासाचे भान श्रीमंत पवारांनी ठेवावे व त्यातच त्यांचे शहाणपण आहे. अर्धी चड्डीवाल्यांच्या हाती सत्ता आली तर ते देशाचे रक्षण करतील. निदान कॉंग्रेस व राष्ट्रवादीवाल्यांप्रमाणे पाकिस्तानच्या हातून देशाचे मुंडके उडवून घेणार नाही, अशी घाणाघाती टीका उद्धव यांनी पवारांवर केली आहे.
पुढे वाचा, पवारांसोबत काँग्रेसवरही हल्लाबोल...