आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Defends Rss Chief Mohan Bhagwat

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोहन भागवत काहीच चुकीचे बोलले नाहीत- उद्धव ठाकरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रत्येक भारतीय हिंदू आहे या संघ प्रमुखांच्या वक्तव्यानंतर उठलेल्या वादळात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोहन भागवतांचा बचाव केला. उद्धव म्हणाले, की माझे स्वर्गीय वडील बाळासाहेब ठाकरे हेसुध्दा अशाच विचारधारेचे होते.
मोहन भागवत 10 ऑगस्टला एका भाषणात म्हणाले, "जर इंग्लंडमध्ये राहणारा नागरिक इंग्लिश असेल, जर्मनीमध्ये राहणारा नागरिक जर्मन असेल आणि अमेरिकेत राहणारा नागरिक अमेरिकी असेल तर हिंदूस्तानात राहणारा प्रत्येक नागरिक हिंदू का असू शकत नाही?"
उद्धव यांनी बुधवारी रात्री मार्मिक या साप्ताहिकाच्या 54 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधना सांगितले की, मोहन भागवत यांनी जे काही म्हटले आहे, ते सत्य आहे. माझे पिता बाळासाहेब ठाकरेसुध्दा अशाच प्रकारचे विचार मांडायचे. भागवत काय चुकीचे बोलले?
दहिहंडीच्या विषयावर बोलताना उद्धव म्हणाले, की दहीहंडी दरम्यान अल्पवयीन गोविंदांच्या सहभागावर मुंबई उच्च न्यायालयाने आणलेल्या बंदीचे मी समर्थन करतो. मात्र कोणत्याही परिस्थितीत हा उत्सव थांबणार नाही. आगामी विधानसभा निवडणूकीत शिवसेना-भाजप युती सरकारच जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.