आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Going To Dhurgadi Devi For Darshan After KDMC Result

उद्धव ठाकरे कल्याणमधील दुर्गाडी देवीच्या दर्शनाला नगरसेवकांसह जाणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कल्याणमधील ग्रामदेवता दुर्गाडी देवीच्या दर्शनाला जाणार आहे. नवनिर्वाचित नगरसेवक व स्थानिक पदाधिकारी यांच्यासमवेत उद्धव ठाकरे दुर्गाडी देवीचे दर्शन घेतील. - Divya Marathi
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कल्याणमधील ग्रामदेवता दुर्गाडी देवीच्या दर्शनाला जाणार आहे. नवनिर्वाचित नगरसेवक व स्थानिक पदाधिकारी यांच्यासमवेत उद्धव ठाकरे दुर्गाडी देवीचे दर्शन घेतील.
मुंबई- कल्याण-डोंबिवलीकरांनी सत्ताधारी शिवसेनेला स्पष्ट बहुमत दिल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तेथील ग्रामदेवता दुर्गाडी देवीच्या दर्शनाला जाणार आहे. शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व स्थानिक पदाधिकारी यांच्यासमवेत उद्धव ठाकरे दुर्गाडी देवीचे दर्शन घेतील. उद्धव ठाकरे यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य व तेजस ठाकरेही दर्शनाला जाणार आहेत. येत्या मंगळवारी देवीचे दर्शन घेण्याचे समजते आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र पक्षातील नेत्यांनी याला दुजोरा दिला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीत प्रचारादरम्यान शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळावे यासाठी दुर्गाडी देवीला साकडे घातले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनीही कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेची सर्वप्रथम सत्ता आल्यानंतर दुर्गाडी देवीचे दर्शन घेतली होते. ही देवी दुर्गा माता असून, शिवकालीन काळापासून आहे. दुर्गाडी किल्ल्यामुळे या देवीचे नाव दुर्गाडी देवी असे पडले आहे.
पुढे वाचा, काय इतिहास आहे या दुर्गाडी देवीचा...