आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Home, Knife Attack At Matoshrii

'मातोश्री'ची सुरक्षा धोक्यात, उद्धव ठाकरेंच्या घरी चाकूहल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रयातील कलानगर परिसरातील मातोश्री या निवासस्थानी दोन नोकरांत झालेल्या भांडणात एकाने चाकूहल्ला केल्याची घटना समोर आली आहे. हे दोघेही नेपाळी स्वयंपाकी आहेत. या चाकूहल्ल्यात उद्धव ठाकरे यांच्या घरातील मोलकरीणही जखमी झाली आहे. याप्रकरणी हल्ला करणा-या नोकराला पोलिसांनी अटक केली आहे. घटना शनिवारची आहे. दरम्यान, या घटनेनंतर मातोश्रीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निवासस्थान म्हणून मातोश्री अनेक दशकापासून प्रसिद्ध आहे. बाळासाहेबांसारखा हिंदुत्त्ववादी विचाराचा नेता म्हणून नेहमीच मातोश्री दहशतवाद्याच्या हिटलिस्टवर राहिली आहे. त्यामुळे मातोश्रीला व पर्यायाने उद्धव ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली आहे. मातोश्रीला मुंबई पोलिसांचा 24 तास पहारा असतो. या परिस्थितीत ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मातोश्रीवरील तिस-या मजल्यावर उद्धव ठाकरे राहतात. त्याच मजल्यावर स्वयंपाकघर आहे. तेथेच शनिवारी रात्री सेवक व पंडित नावाच्या दोन नेपाळी (स्वयंपाकी) नोकरांत चेष्टामस्करी सुरु होती. त्यातून ही घटना घडली. चेष्टामस्करी सुरु असतानाच पंडितने सेवकचा पाय ओडला. याचा राग आल्याने सेवकने पंडितवर स्वयंपाकघरातील चाकूनेच थेट हल्ला केला. यात मोलकरीणही जखमी झाली. झोन-8 चे पोलिस उपायुक्त विरेंद्र मिश्रा यांनी दुजोरा दिला आहे. दोघांचीही स्थिती आता बरी आहे. पोलिसांनी सेवकला अटक केली असून त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सेवक व पंडित हे नेपाळी नोकर मातोश्रीवर गेली अनेक वर्षे आचा-याचे काम पाहत आहेत.