आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात कंपन्यांमध्ये उद्धव ठाकरेंचे हितसंबंध, किरीट सोमय्यांचा आरोप (महाकाैल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपचे खासदार किरीट सोमयांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. आपली संपत्ती आणि आर्थिक व्यवहार आपण आपल्या संकेतस्थळावर जाहीर केल्याचा दावा करत सोमय्यांनी उद्धव ठाकरेंनीही त्यांची  संपत्ती आणि आर्थिक व्यवहार जाहीर करावेत, असे थेट आव्हानच दिले आहे. आपल्या अधिकृत लेटरहेडवर प्रसिद्ध केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सोमयांनी उद्धव ठाकरेंचे आर्थिक हितसंबंध असलेल्या सात कंपन्यांची नावेही उघड केली असून त्यावर खुलासा करण्याचे आव्हानही त्यांना दिले अाहे.

मुंबई महापालिकेचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना, आता भाजपने शिवसेनेविरोधात अधिकच आक्रमक भूमिका घ्यायला सुरूवात केली आहे. महापालिकेतील माफियाराज आणि घोटाळ्यांद्वारे मिळालेला पैसा थेट ‘मातोश्री’वर जातो असा थेट आरोप करणाऱ्या सोमयांनी केला हाेता. आता तर आणखी पुढे जात त्यांनी सात कंपन्यांची यादी जाहीर करत त्यात उद्धव ठाकरेंचे आर्थिक हितसंबंध असल्याचा अाराेप केला आहे. जगमंद्री फिनवेस्ट प्रा.लि, किम इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीज लि, जेपीके ट्रेडिंग प्रा.लि, लेक्सस इन्फोटेक लि, रिगलगोल्ड ट्रेडिंग कंपनी प्रा.लि, वॅनगार्ड ज्वेल्स लिमिटेड आणि यश -व्ही ज्वेल्स लि, या सात कंपन्यांमध्ये उद्धव ठाकरेंद्वारे मनिलॉन्डरींग झाल्याचा आरोप सोमयांनी केला आहे. 
 
यापैकी रिगलगोल्ड ट्रेडिंग कंपनी प्रा.लि. आणि वॅनगार्ड ज्वेल्स लिमिटेड या दोन कंपन्यांचा वापर छगन भुजबळांनी देखील आपला काळा पैसा पांढरा करण्यासाठी केल्याचा आरोपही सोमयांनी केला आहे. तर यश-व्ही ज्वेल्स लिमिटेड आणि लेक्सस इन्फोटेक लिमिटेड या दोन कंपन्यांवर सेबीने निर्बंध लादल्याची माहिती सोमयांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. या शिवाय शिवसेनेच्या कोणकोणत्या मोठ्या नेत्यांचे मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात हात आहेत, त्याची माहितीही आपल्याजवळ असून लवकरच ती जाहीर करणार असल्याचा गौप्यस्फोटही सोमय्यांनी केला आहे.  
 
साेमय्यांची संपत्ती सव्वा सात काेटींची
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर आरोप करताना सोमय्या यांनी १९९५ ते २०१४ या १९ वर्षांतील स्वत:ची संपत्तीही आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे. त्यानुसार २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात सोमय्यांची एकूण संपत्ती ७ कोटी २१ लाख ५६ हजार २५८ रुपये इतकी असून सन २००९ साली ती ४ कोटी ७८ लाख ८१ हजार २६९ रुपये इतकी होती. २००४ साली त्यांनी निवडणुक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती २ कोटी २५ लाख ९ हजार इतकी होती.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...