आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना सत्‍तेत सहभागी; पण सरकार आमचे नाही : उद्धव ठाकरे यांची खंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई – केंद्रात आणि राज्‍यात अशा दोन्‍ही ठिकाणी शिवसेना सत्‍तेत सहभागी आहे. पण, ही सरकारं शिवसनेची नाहीत, अशी खंत शिवसेनेचे कार्याध्‍यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसनेने मुखपत्र असलेल्‍या ‘सामना’ला दिलेल्‍या मुलाखतील व्‍यक्‍त केली. ठाकरे म्‍हणाले, ‘‘पूर्वी एनडीए होतं. एनडीएतील घटक पक्षांना विश्‍वासात घेऊन अटलजी सरकार चालवत होते. इतरांच्‍या, मित्रांच्‍या म्‍हणजे शिवसेना, अकाली दलासारख्‍या घटकं पक्षांच्‍या भावना विचारात घेऊन अटलजी पावलं टाकायाचे. आताही ठीकच चाललेय. पुन्‍हा एनडीएच्‍या बैठका सुरू झाल्‍या, ही चांगली गोष्‍ट नक्‍कीच घडलीय की, केंद्रात एक मजतबूत आणि बिनकुबड्यांचं सरकार आलंय. नरेंद्र मोदींकडून देशाला व लोकांना फार मोठ्या अपेक्षा आहेत. काहीतरी करून शकतील तर फक्‍त ते आणि तेच करू शकतील’’, अशा आशावादही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.
‘‘कॉंग्रेसवाले कर्जमाफी म्‍हणताहेत, कसली माफी? माफी ही गुन्‍हेगारांना दिली जाते. माफी शब्‍द मला नाही. शेतकरी हा गुन्‍हेगार आहे का? तो गांजलेला आहे. परिस्थितीनं पिचलेला आहे. त्‍याला आधार द्यायचा असेल तर कर्जमुक्‍ती द्यायलाच हवी’’, अशी मागणीही ठाकरे यांनी रेटून धरली. सध्‍याच्‍या सरकारचे काय नेमके काय चुकत आहे, या प्रश्‍नाचे उत्‍तर देताना ते म्‍हणाले, ‘‘ चुकत काहीच नाही. लोकांना बदल लवकर हवा असतो आणि यंत्रणांचा वेग कमी असतो. आज त्‍याच त्‍याच बातम्‍या आपण रोज वाचतो. मग मनात विचार येतो अरे याच बातम्‍या आपण पूर्वीसुद्धा वाचत होतो. शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍या असतील, बेकारांचे मोर्चे असतील, महिलांसंदर्भात गुन्‍हे... सगळ्याच. जो बदल घडतोय असे राज्‍यकर्त्‍यांना वाटतो तो बदल खरोखरच घडतोय ही भावना लोकांमध्‍ये जागृत झालेली नाही’’, असे ते म्‍हणाले.
सरकार बदलले तरी काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडे कसे फडकतात, असा प्रश्‍नही विचारत राष्ट्रहिताशी कुठलीही तडजोड न करता पाकिस्तानचा मुकाबला करा, असा सल्लाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे. तर अच्छे दिनाचा वायदा आहे, लोकांना फसवता येणार नाही, असेही मुलाखतीदरम्‍यान ते म्‍हणाले. या शिवाय राज्यात येऊन युतीचे राजकारण पुरे करा असे सांगणा-या भाजपाध्यक्षांना काश्मीरमध्ये पाकधार्जिण्या पक्षासोबत युती कशी चालते? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच कॉंग्रेसने करून ठेवलेली घाण साफ करायला 5 काय 50 वर्षेही पुरणार नाहीत. पण, या पाच वर्षांत बरेच काही करावे लागेल, असेही म्‍हणाले.