मुंबई – ‘‘भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी स्वबळाची भाषा करावी यात काहीच चूक नाही. हीच स्वबळाची भाषा त्यांनी कश्मीरात जाऊनही करावी’’, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीतून ठणकावले. आज (शनिवार) सामनामध्ये या दीर्घ मुलाखतीचा अंतिम भाग प्रकाशित झाला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अत्यंत खणखणीत शब्दात बजावले, ‘‘मुंबई-महाराष्ट्रातले उद्योगधंदे बाहेर घेऊन जायचे कारस्थान कोणी करीत असेल तर त्यांची गाठ शिवसेनेशी आहे,’’ उद्धव ठाकरे यांनी अत्यंत मनमोकळेपणे स्पष्ट केले की, ‘‘जोपर्यंत महाराष्ट्राचे सरकार चांगले काम करीत आहे तोपर्यंत निदान शिवसेनेकडून तरी सरकारला धोका नाही.
पुढील स्लाइडवर वाचा नव्या भूसंपादन कायद्याबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे