आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाटेवर तरंगणारे आम्ही ओंडके नाही- उद्धव ठाकरेंचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आपण मोठी लढाई लढली त्यात यशस्वी झालो. बाळासाहेबांनी षंड नव्हे तर मर्दच तयार केल्याचे आपण सर्वांनीच सिद्ध केले. आपण कुठल्याही लाटेवर तरंगणारे ओंडके नाही. जे काही आहे ते आपण आहोत असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचे आभार मानले. याचबरोबर प्रदेश भाजपवर अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनी टीका केली.
माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा मेळावा झाला. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. त्याआधी ‘सावरकर ते बाळासाहेब : दोन हिंदुहृदयसम्राट’ या विषयावर अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान झाले. तसेच ‘मँचेस्टर गार्डियन’ या गाजलेल्या दैनिकाच्या पत्रकार ताया झिंकीन लिखित ‘रिपोर्टिंग इंडिया’ या पुस्तकाचा अनुवाद साप्ताहिक ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांनी केला आहे. त्या पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्धव ठाकरे म्हणाले, विधानसभा निवडणुकीला सगळे लोक आपल्याविरोधात होते. तरीही आपण निकाराने लढाई लढलो व यशस्वी झालो. शिवसैनिक वाघ असल्याचे यातून आपण दाखवून दिले. आपण कुठल्याही लाटेवर तरंगणारे ओंडके नाही हे सिद्ध झाले असे सांगत मोदी लाटेमुळे राज्यात भाजपला यश मिळाले असे अप्रत्यक्ष सुचित केले
शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे काय-काय म्हणाले...
- फोटो प्रदर्शनातून 5 कोटी मिळाले ते शेतक-यांना देणार
- हिंदुना 10 मुले पाहिजेत पण त्यांना पोसणार कोण?
- स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ द्यायला हवा
- नुसती मेंढराची पिल्लं नको, एक वाघ पुरेसा आहे.
- कलम 370 अजून का काढले जात नाही?
- जम्मू-काश्मीर मधून जे हिंदू पंडित घरं सोडून गेले, त्यांची घर वापसी होणार की नाही?
- बाळासाहेबांच्या स्मारकासाठी उंबरठे झिजवणार नाही, मला नुसता पुतळा नको आहे मला ते अपेक्षितही नाही
- देशात समान नागरी कायदा कधी लागू करणार
- आम्ही रक्त सांडून मुंबई मिळवली, जराशी जखम झाली तरी रक्त सळसळतं
- आमच्यासमोर आदर्श शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर, बाळासाहेब ठाकरे..
- मराठवाड्यातील दुष्काळी भागात पुन्हा दौरा करणार
- सरकारमध्ये आहोत म्हणून शांत बसणार नाही, सरकारच्या अन्यायावर पहिला वार शिवसेना करेल
- महाराष्ट्राच्या जनतेच्या आयुष्यात सुखाचे दिवस आणण्यासाठी शिवसेना सरकारमध्ये
- छायाचित्रांच्या प्रदर्शनातून गोळा झालेल्या पैशाचा लोकहितासाठी वापर करणार
- माझा छंद फोटोग्राफी पण त्यावरही लोक टीका करतात
- पण त्यांचे छंद वेगळेच, ते छंद सांगूही शकत नाही
- माझ्या छंदाचं मी दिवसाढवळा प्रदर्शन करतो
- इतरांनी हिंमत असेल तर त्यांच्या छंदाचं प्रदर्शन करावे
- काही लोक आता दप्तराचे ओझे हलके करण्यासाठी भेटी घेत आहेत
- माझी शिवसेना शिव आरोग्य सेवा सुरु करेल