आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांचा झाकीर नाईक होता कामा नये, त्यांची नाही आपली दहशत वाटली पाहिजे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मिरारोड- भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीनंतर जैन मुनी आणि शिवसेनेमध्ये उद्भवलेल्या संघर्षाचे पडसाद,  मातोश्रीवर झालेल्या संपर्कप्रमुखांच्या बैठकीतही पाहायला मिळाले. ‘जैन मुनीचा झाकीर नाईक होता कामा नये. आपल्याला त्यांची नाही तर त्यांना आपली दहशत वाटली पाहिजे.’ अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या.

मीरा रोड-भाईंदर महापालिकेमध्ये जैन मुनी न्याय पद्मसागर यांनी भाजपसाठी जोरदार प्रचार केला होता. जैनमुनींचा प्रचार नियमबाह्य असल्याची तक्रार करत शिवसेनेच्या संजय राऊतांनी त्यांची तुलना दहशतवाद्यांनी केली होती, त्यानंतर जैन समुदायाने राज्यभर शिवसेनेविरोधात निदर्शने केली होती.

‘मातोश्री’वरील शिवसेना संपर्कप्रमुख आणि नेत्यांच्या बैठकीत संघटनात्मक बांधणीवरून चांगलीच चर्चा झाली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात नेमलेले संपर्कप्रमुख आणि संघटक एकमेकांना ओळखतच नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या नेमणुका कुणी आणि कशा केल्या याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी रामदास कदम यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी नेत्यांना कानपिचक्याही दिल्या.

या बैठकीला शिवसेनेचे राज्यभरातील सर्व संपर्कप्रमुख आणि संपर्क नेते हजर होते. तसेच खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार गजानन किर्तीकर आणि अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते.

पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...