मुंबई - भाजपाध्यक्ष
अमित शहा यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्याने संतापलेल्या शिवसेने गुरूवारी रात्री भाजपकडे अंतिम प्रस्ताव पाठवला. २८८ पैकी ११९ जागा भाजपला, तर १६९ जागा शिवसेनेकडे, हा २००९ प्रमाणेच फॉर्म्युला कायम राहील, असे त्यात म्हटले. ज्याने- त्याने
आपापले घटक पक्ष आपल्या कोट्यातून सांभाळावेत, असेही त्यात सुचविले आहे.
भाजप नेत्यांनी मात्र हा प्रस्ताव धुडकावून लावला. दरम्यान, शुक्रवारी भाजपची बैठक हाेणार असून त्यात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. शिवसेना गुरुवारी जास्तच आक्रमक झाली हाेती. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक घेण्यात अाली. ‘ही अामची अंतिम बैठक असून भाजपला ११९ जागा देण्याचा आमचा िनर्णय अंतिम असून त्यात आता बदल हाेणार नाही,’ असे एका ज्येष्ठ शिवसेना नेत्याने सांगितले.