आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray News In Marathi, Mohan Ravale Comeback , Girgaon Rally

व्हाया राष्ट्रवादी कॉँग्रेस मोहन रावले पुन्हा शिवसेनेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पाच वेळा शिवसेनेकडून खासदारपद मिळविलेले व महिनाभरापूर्वीच राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये गेलेले मोहन रावले यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर रावले यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर टीका करत राष्ट्रवादीचा रस्ता धरला होता. मात्र ते फार काळ तिथे रमले नाहीत.

‘रागाच्या भरात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या मी मान्य करतो. बाळासाहेबांच्या निधनानंतर मला जेवढय़ा यातना झाल्या तेवढय़ाच यातना शिवसेना सोडल्यानंतर झाल्या. शिवसेना माझा प्राण आहे. या पक्षाशिवाय मी राहू शकत नाही. त्यामुळे मी पुन्हा शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगून मी हा निर्णय घेतला, तेव्हा त्यांनीही औदार्य दाखवत मला अडविले नाही,’ असे सांगत रावलेंनी शिवसेनेच्या व्यासपीठावर शरद पवारांचेही गुणगाण केले.

पुढे वाचा, 'शिवसेनाप्रमुखांचा अंगरक्षक' ते 'खासदार'पर्यंतचा मोहन रावले यांचा प्रवास