आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराघरात शिवसेना पोहोचवा, उद्धव ठाकरे यांचे जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुखांना आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यभरात शिवसेनेची स्वतःची अशी ताकद तर आहेच. मात्र, अाता प्रत्येक गावात व प्रत्येक घरात शिवसेना पोहोचली पाहिजे आणि त्यासाठी संपर्कप्रमुखांसह सगळ्यांनी कामाला लागावे, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांच्या बैठकीत दिल्याचे समजते.

शिवसेना भवन येथे शुक्रवारी राज्यातील शिवसेनेच्या सर्व जिल्हा संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुखांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला उपस्थित सूत्रांनी दिव्य मराठीला माहिती देताना सांगितले, चार तास चाललेल्या या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाली. प्रत्येक महसूल विभागानुसार उद्धव ठाकरे यांनी बैठका घेतल्या. या बैठकीत शिवसेनेने स्वबळावर सर्व निवडणुका लढवाव्यात असा सूर सगळ्यांनी काढला. भाजपबरोबर युती करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार असून ते जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असणार आहे. असे असले तरी शिवसेनेची ताकद वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.

शिवसेना करत असलेली कामे प्रत्येक घरात पोहोचवावी असे ठाकरे यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त भागात शिवसेनेतर्फे जास्तीत जास्त मदत करावी अशा सूचनाही त्यांनी या वेळी उपस्थितांना केल्या. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेना तत्पर आहे हा संदेश दुष्काळग्रस्तांपर्यंत पोहोचवावा, असेही ठाकरे यांनी या वेळी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...