आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंची मागणी :अॅट्रॉसिटीवर विशेष अधिवेशन घ्या, पूर्णवेळ गृहमंत्री नेमण्याचा अाग्रह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अॅट्रॉसिटीचा गैरवापर झाला असे शरद पवार म्हणतात. राज्यात सर्वाधिक काळ आघाडीचेच सरकार होते. मग त्यांनी अन्याय केला आहे असे म्हणायचे का? असा प्रश्न करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अॅट्रॉसिटीबाबत शरद पवार यांनी स्पष्ट बोलावे आणि आपली भूमिका स्पष्ट करावी. अॅट्रॉसिटीसाठी खास अधिवेशन बोलवावे, अशी मागणी शनिवारी केली. तसेच राज्याला पूर्णवेळ गृहमंत्र्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.

काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी शनिवारी मातोश्रीवर उद्धव यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार म्हणतात की जातीय तेढ वाढू नये. आमचीही हीच भूमिका आहे. शरद पवार यांची नीती मराठा समाजाला चांगलीच माहिती
आहे.त्यांना दोन्ही समाजाला जवळ ठेवायचे आहे. अॅट्रॉसिटीबाबत सगळ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि दोन्ही समाजाला विश्वासात घेतले पाहिजे. मराठा समाजाचे निघणारे मोर्चे त्यांच्या भावना व्यक्त करीत आहेत. त्यांचा उद्रेक होण्याआधी सरकारने गैरसमज दूर करावा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

विलास शिंदेंच्या मृत्यूच्या घटनेबाबत जनतेत संताप आहे. कायदा व्यवस्थेची अंमलबजावणी कठोरपणे केली पाहिजे मात्र यासाठी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री हवा. मुख्यमंत्री सक्षम आहेत परंतु त्यांना बाकी खात्यांचा व्याप जास्त आहे त्यामुळे पूर्ण वेळ देणारा वेगळा सक्षम गृहमंत्री हवा. एका हेल्मेटवरून मुंबईचा पोलीस शहीद झाला हा प्रकार राज्याला शोभणारा नाही. क्षुल्लक कारणांसाठी पोलिसांना शहीद व्हायला लावू नका. त्यांनाही कुटुंब आहे हे लक्षात ठेवा असेही उद्धव ठाकरे यांनी बजावले.

शिवसेनेने लावलेल्या गुजराती पोस्टर विषयी बोलले जात आहे पण भाजपला आताच बाठी चोखाची आठवण का झाली असा प्रश्न करीत गुजराती ही काय पाकिस्तानची भाषा आहे का असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी केला.

शरद पवारांना कळवळा का येतो?
शरदपवार यांनी मुस्लिम तरुणांना उगाचच अटक केली जात असल्याच्या वक्तव्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शरद पवार यांचा मुस्लिम कळवळा समजू शकतो. पोलिस विलास शिंदे मारले गेले त्यावर पवार का बोलत नाहीत ? इसिसच्या मुलांचा पवारांना कळवळा का येतो?
- ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई व नागपुरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
- कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना ठाकरे यांनी अॅट्रॉसिटीच्या वादावर भूमिका स्पष्ट केली.
- ठाकरे म्‍हणाले, अॅट्रॉसिटीवरुन जातीय तेढ निर्माण नये, ही शिवसेनेची भूमिका आहे.
- मराठा समाजाचे उत्स्फूर्त मोर्चे हे भावना व्यक्त करणारे आहेत.
- त्यांच्या भावनांचा उद्रेक होण्याआधी मोर्चांना सरकारने गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
- सरकारने दोन्ही समाजाला विश्वासात घेणे गरजेचे आहे.
- मराठा समाजाला शरद पवार यांची निती चांगलीच माहित आहे.
- त्यामुळे पवारांचा मुस्लीम व मराठा समाजाशी जवळीक वाढण्याचा हा प्रयत्न आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, आधी काय म्‍हणाले होते शरद पवार, नंतर कसे दिले स्‍पष्‍टीकरण..
बातम्या आणखी आहेत...