आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरे यांचा दौरा, आज जालन्यात सभा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारपासून राज्याच्या दौ-यावर निघत आहेत. पहिली सभा जालना येथे होणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीमुळे उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातून दौरा सुरू करण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांची रविवारी ज्या ठिकाणी सभा होत आहे, त्याच ठिकाणी बरोबर एक महिन्याने म्हणजे 2 मार्च रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सभा घेणार आहेत. राज ठाकरे येत्या 10 फेब्रुवारीपासून सातारा येथून दौरा सुरू करत आहेत. राज यांच्या दौ-याचा कार्यक्रम पत्रकारांना देण्यात आला आहे. कोल्हापूर येथे 12 रोजी त्यांची पहिली सभा होणार आहे.