आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही मुकाट अश्रू गाळत राहा, आम्ही चहा पित बसू; मोदींचे नाव न घेता उद्धव ठाकरे कडाडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पाकला उत्तर देण्याचे काम कोणी तरी मर्द नेता करेल की नाही, असा सडेतोड सवाल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे नाव न घेता केला आहे. पाकिस्तानकडून वारंवार होणारे हल्ले आणि गृहमंत्र्यांचा तिथे झालेल्या अपमानाचा बदला भारत केव्हा घेणार असा सवाल करत हा माझा संताप नाही तर देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनातील संपात असल्याचे ते म्हणाले.
आणखी काय म्हणाले उद्धव
- 'मागच्या पानावरुन पुढे चालू, असे असेल तर बदल नेमका कशात झाला आहे?' असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
- 'पाकला सडेतोड उत्तर दिले पाहिजे' असे सांगत, पाकिस्तानविरोधात भारत सरकारने कडक भूमिका घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
- 'पाकला धडा शिकवतील, असा विश्वास ठेवून लोकांनी मोदींना एकहाती सत्ता दिली होती.
त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी लोकांना जी वचने दिली होती, त्याची आठवण ठेवावी.'

उरी हल्ल्यात महाराष्ट्रातील 4 जवान शहीद
- जम्मू-काश्मीरमधील उरी येथे 18 सप्टेंबर रोजी आर्मी ब्रिगेड हेडकॉर्टरवर पाकिस्तानी दहशतवादयांनी हल्ला केला. त्यात 18 जवान शहीद झाले होते.
- सीमेपलिकडून दहशतवादी सलामाबाद नाल्यातून दाखल झाले होते. पोस्टवर जवानांच्या ड्यूटी चेंज टायमिंगला दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.
- दहशतवाद्यांनी जवानांच्या ज्या तंबूवर ग्रेनेड फेकले तिथे जवान झोपलेले होते. यात 13 जवान शहीद झाले.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, उद्धव ठाकरेंनी करुन दिली निवडणूकीतील वचनांची आठवण
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...