आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Presents Mumbai Vision Documents

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज ठाकरेंच्या 'ब्ल्यू प्रिंट'च्या आधीच उद्धव यांचे 'व्हिजन' मुंबई!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवून मुंबईकरांची मान जगभरात उंचावेल असे विकासाचे 'व्हिजन डॉक्युमेंट' शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सादर केले. गोराई ते नरीमन पॉइंट हा महाकाय कोस्टल रोड उभारण्याचा आराखडा, कोस्टल रोडबरोबरच मुंबईच्या 911 एकरांवरील पूर्व किनार्‍याचा विकास, रेसकोर्सवर जागतिक दर्जाचे थीम पार्क आदी विकासाचे प्रकल्प पूर्णत्त्वास नेऊन मुंबईचा अमूलाग्र बदल घडवून आणण्याचा निर्धार शिवसेना व उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्याचे यातून दिसत आहे. दुसरीकडे, गेल्या 6-7 वर्षापासून मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दाखविलेल्या ब्ल्यू प्रिंटच्या आधीच शिवसेनेने राज यांच्यावर कुरघोडी केली आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी याबाबत राज यांच्यावर आघाडी घेत विधानसभेच्या दृष्टीने योग्य पाऊल टाकल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन या व्हिजन डॉक्युमेंटचे स्क्रीनवर सादरीकरण केले. हे महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी काय काय करायचे आहे; त्याची शास्त्रोक्त माहितीही उद्धव यांनी दिली. यावेळी पंजक जोशी यांनी व्हिजन डॉक्युमेंटचे सादरीकरण केले. सादरीकरण करण्यापूर्वीच उद्धव ठाकरे म्हणाले, ही सुरुवात आहे. पण याचा अर्थ एवढेच प्रकल्प करणार आहोत असे नाही. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी अनेक प्रकल्प राबविणार आहोत. त्याचा अभ्यासही सुरू आहे. मुंबईसाठी अनेक गोष्टी आपल्या आधीच्या पिढीने केल्या आहेत. गेट वे ऑफ इंडियासारख्या वास्तू इंग्रजांनी तयार केल्या. आपण काहीच करू शकलो नाही. म्हणूनच मुंबईकरांसाठी हे विकासाचे व्हिजन डॉक्युमेंट सादर करण्यात येत आहे.
मुंबईचा विकास आराखडा दोन वर्षे पुढे ढकलला जातोय मग हे प्रकल्प कसे पूर्ण होणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले, सध्या आमच्या हातात काहीच नाही. जमीनही पालिकेच्या ताब्यात नाही. आता ही पूर्व किनार्‍याची 911 एकर जमीन जमेस धरून नवीन विकास आराखडा तयार करायच्या सूचना महापौरांना देणार आहे. मुंबईकरांना 24 तास पाणीपुरवठा व्हावा म्हणून गारगाई-पिंजाळ प्रकल्पाबरोबरच दमणगंगा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. आपला रेसकोर्सला विरोध नसल्याचे सांगत रेसकोर्स मुंबईबाहेरही हलविण्यात येऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना भेटून तिन्ही प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात येईल. महायुतीचे सहाही खासदार प्रकल्पाचा पाठपुरावा करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
पुढे वाचा, कसे आहे कोस्टल रोड, पूर्व किनारा व थीम पार्कचे व्हिजन डॉक्युमेंट...