आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने मर्यादा पाळाव्यात, खेचाखेची नको; 135 जागा देणे अशक्य- उद्धव ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे)
मुंबई- महायुतीतील जागावाटपांबाबत भाजप-शिवसेनेची चर्चा सुरु आहे. दोघांनी एकमेंकांचे प्रस्ताव दिले आहेत. मात्र, भाजपला 135 जागा देणे अशक्य असल्याचे सांगत शिवसेना 150 जागांपेक्षा एकही कमी जागा लढविणार नाही असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी व्हिजन डॉक्युमेंटबाबत शेती या विषयाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. त्यावेळी त्यांनी शेती व शेतक-यांना काय सुविधा देणार याबाबत सादरीकरण केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
उद्धव म्हणाले, राज्यात महायुतीसाठी व हिंदुत्त्वासाठी चांगले दिवस आहेत. मी काही बोलून वातावरण खराब करू इच्छित नाही. जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. युती कायम राहावी असे मला वाटत आहे. युती तुटेल असे मी व माझा पक्ष काहीही करणार नाही. भाजप-सेनेने एकमेंकांना जागांबाबत प्रस्ताव दिले आहेत. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मला याविषयी अधिक बोलावे वाटत नाही. पण जागावाटपावरून उगाच खेचाखेची नको. भाजपने आपल्या मर्यादा सांभावळ्यात. भाजपने दिल्लीत सरकार आणण्यासाठी मिशन 272+ मिशन ठेवले होते. तर शिवसेनेने मिशन 150+ ठेवले तर बिघडले कुठे?. त्यावेळी आमच्यासह कोणत्याही घटकपक्षांने आक्षेप घेतला नाही. मग भाजप आता कशासाठी आक्षेप घेतोय. भाजपला 135 जागा देणे मला शक्य नसल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले.
शिवसेना-भाजपची युती मागील 25 वर्षापासून युती आहे. जागावाटपाबाबत चर्चा सरु आहे, त्यावर 2-3 दिवसांत निर्णय घेऊन हा विषय एकदाचा संपवून टाकू. बघू या आता काय होते ते, असे सांगत प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो असे वक्तव्य केले. या वक्तव्याच्या मागे भाजपने ताणून धरले तर शिवसेना स्वबळावर लढेल असेच संकेत उद्धव ठाकरेंनी दिले.
मोदी लाटेबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी छेडले असता उद्धव म्हणाले, होय मी काहीही चुकीचे बोललो नाही. मी लहानपणापासून समुद्राच्या लाटा पाहिल्या आहेत. शिवसेना नसताना मला बाळासाहेब समुद्रकिनारी घेऊन जायचे. पावसात आलेल्या लाटांची तर आम्ही खूप अनुभवली व आनंद घेतला असा खोचक टोलाही उद्धव यांनी हाणला.
शिवसेनेने मोदींचा सन्मान राखला नसल्याने कार्यकर्त्यांच्या भावनेखातर आम्ही सेनेशी जागावाटपाची बोलणी थांबविली असल्याचे भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांच्या वक्तव्यांचा उद्धव यांनी खरपूस समाचार घेतला.
उद्धव ठाकरे काय म्हणाले माधव भंडारी यांच्याबद्दल वाचा पुढील स्लाईडवर...