मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत
आपल्या पक्षाचा 'वचकनामा' प्रसिद्ध केला. उद्धव यांनी मातोश्रीवर आज निवडक नेत्यांच्या उपस्थितीत हा वचकनामा जाहीर केला. यावेळी उद्धव यांनी सांगितले की, हा माझ्या पक्षाचा जाहीरनामा, वचकनामा असला तरी तो माझा संकल्प आहे. मी हा संकल्प पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही.
काय आहे या वचकनाम्यात...
- रेसकोर्सवर थीम पार्क उभारणार
- कोस्टल रोड तयार करणार
- बिझनेस, अॅग्रीकल्चरल हब तयार करणार
- अखंड महाराष्ट्रासाठी कटिबद्ध
- मुंबईच्या सौंदर्याकरणावर भर देणार, समुद्रकिना-याचे सौदर्यात वाढ करणार
- विद्यार्थ्यांना मोफत टॅब देणार
- राज्यात वर्च्युअल क्लासरूमची सोय-सुविधा उभारणार
- टेलिमेडिसन व आरोग्य सेवा सुधारणार