आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Raj Thackeray May Come Together After Bjp Misbehevior With Sena

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाचे धक्क्यांवर धक्के; उद्धव-राज एकत्र येण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेल्या 24 तासापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक भूकंप घडले आहेत. याचबरोबर पुढील 24 तासात आणखी काही राजकीय भूकंप घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे. राज आणि उद्धव हे एकमेंकांच्या संपर्कात असून, मनसे-शिवसेना एकत्र निवडणुका लढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपने ज्या पद्धतीने शिवसेनेशी व्यवहार केला तो पाहता राज ठाकरेंची सहानूभुती उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे. भाजप जर आज शिवसेनेला अशा स्थितीत सोडू शकतो तर भविष्यात ते कोणासोबतही असाच व्यवहार करू शकतो. त्यापेक्षा आपली माणसं व मराठी अस्मिता हा विचार करून राज ठाकरे सेनेसोबत जाण्याचा विचार करत असल्याची माहिती पुढे येत आहे. मागील काळातील कटुता विसरून हे दोघे भाऊ एकत्र येऊ शकतात असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. दरम्यान, शिवसेना व मनसेने आम्ही एकमेंकांच्या संपर्कात असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माबितीनुसार, राज ठाकरे व उद्धव ठाकरे काल रात्रीपासून एकमेंकांच्या संपर्कात आहेत. सध्याच्या स्थितीत काही करता येईल का चाचपणी करीत आहेत. यासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची मुंबई वगळता राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. मोजक्या लोकांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे. तर, मनसेने बहुतेक उमेदवारांचे एबी फॉर्म वाटप थांबवले आहे. राज यांनी काल सायंकाळीच 153 जागांवर उमेदवार जाहीर केले. मनसे आज किमान 50-60 जागांवर उमेदवार जाहीर करणार होते मात्र ही यादी थांबविण्यात आल्याचे कळते आहे.
उद्धव ठाकरे मातोश्रीवर शिवसेनेच्या उमेदवारांची नावे निश्चित करीत आहेत. तसेच राज यांच्याशी वारंवार संपर्कात आहेत. त्यामुळे आज रात्रीपर्यंत या दोघांत काही चर्चा होऊ शकते. कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ 24 तास शिल्लक आहेत. दुसरीकडे, सेना-मनसेत निवडणूकपूर्व युती होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, निवडणुकीच्या काळात ते एकमेंकांच्या उमेदवारांना सहकार्य करू शकतात. तसेच निवडणुकीनंतरही ते एकत्र येऊ शकतात.
राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आल्यास काय होईल महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम... वाचा पुढे...