आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी पाकड्यांशी आता मन की बात नाही, गन की बात करावी; उद्धव ठाकरे यांचा \'हल्ला\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जम्मू-काश्मिरात एलओसीवर पाकने भारताच्या शहीद जवानांच्या मृतदेहांची विटंबणा केल्यावरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. सीमेवर जवान शहीद होत आहेत. महिला विधवा होत आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात नाही, तर गन की बात करावी, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला आहे. एलओसीवर सोमवारी घडलेल्या गोळीबारानंतर बुधवारी पुन्हा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. 
 
कृष्णा घाटीत भारतीय जवानांवर झालेल्या पाकच्या हल्ल्यानंतर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच एका डोक्याच्या बदल्यात 10 डोके आणू म्हणणारे पीएम मोदी शांत का आहेत? असा सवालही उपस्थित केला. 
 
नियंत्रण रेषेवर तणाव कायम
- दोन शहीद जवानांचा अपमान झाल्यावरून भारत आणि पाकिस्तानात एलओसीवर (नियंत्रण रेषा) तणाव बुधवारीही तसाच आहे. त्यातही पाकिस्तानच्या सैनिकांनी बुधवारी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारताच्या दिशेने गोळीबार केला. 
- पाकिस्तानच्या शस्त्रसंधी उल्लंघनास सीमेवर तैनात भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. पाकने सोमवारी केलेल्या हल्ल्यानंतर मंगळवारी भारताने पाकिस्तानच्या सीमाहद्दीतील 2 चौक्या उद्ध्वस्थ केल्या. 
- दोन्ही देशांच्या लष्कराचे डीजीएमओ हॉटलाईनवरून हॉटलाईनवरून चर्चा करत आहेत. यात पाकिस्तानने भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना करण्याचे तथ्य झुगारून लावले. 
 
शिवसेना-भाजपमध्ये फूट
- महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सोमवारच्या घटनेवरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाराज आहेत. विरोधी पक्ष पंतप्रधानांवर टीका करत असताना सहकारी पक्ष शिवसेनाही मागे राहिलेला नाही.  
- राष्ट्रपती निवडणुकीला अवघे काही दिवस राहिले असतानाच भाजप शिवसेनेला मनवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, शिवसेनेने या पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)चे सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव पुढे केले. भागवत यांनी मात्र, आपल्याकडे प्रस्ताव आला तरीही नकार देणार असे यापूर्वीच स्पष्ट केले. दोन्ही पक्षांमध्ये काही दिवसांपासून वाद नसतानाच आता एलओसीवरील घटनेवरून शिवसेना मोदींविरोधात आक्रमक झाली आहे. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...